जैवविविधता व्यवस्थापन समिती जि. प. स्तरावरील सभा 12/04/2018

महाराष्ट्र शासनाकडील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे व महाराष्ट्र जैविक विविधता नियम 2008मध्ये सुचित केलेप्रमाणे पंचायतराज व्यवस्थेतील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणेअनिवार्य असलेमुळे आज दिनांक 12 एप्रिल 2018 रोजी जिल्हा परिषद स्तरावरील जैव विविधता व्यवस्थापन समितीची सभा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

मा. श्री. ए. डी. जाधव,सदस्य, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ व फॅकल्टी डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी जैवविविधता मंडळ व अनुषंगिक बाबींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जैवविविधतेच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरुन निसर्गातील सर्व घटकांच्या नोंदी व त्यंाचे संवर्धन करणे आवश्यक असलेने सदरचा कायदा केंद्र शासनाकडून करणेत आला असून त्याची कार्यवाही ग्राम पंचायत स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे.त्यानुसार निसर्गातील प्रत्येकघटक अत्यंत महत्वाचा असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेने त्या सर्व घटकांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ज्या दुर्मिळ जाती-प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्या संवर्धन केल्या तरच निसर्गाचा समतोल राहणार आहे. याबाबतीत आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत आवश्यक असलेबाबत नमुद केले.

मा. श्री. शाम बजेकल, इमिरिटस बायो डाव्हरर्सिटी फेलो यांनी केंद्र शासनाने जैवविविधता कायदा, 2002 व महाराष्ट्र शासन जैविक विविधता नियम 2008 मधील नमुद केलेल्या बाबी व तरतुदी यांचे सविस्तर विवेचन केले.कोणत्याही बाबीचे जागतिकस्तरावरील पेटेंट मिळण्यासाठी त्या बाबीची लेखी स्वरुपातील स्थानिक माहिती व पुरावे कायद्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असून ग्राम पंचायत स्तरावरुन सदर माहितीचे योग्य प्रकारेसंकलन करुन नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. सदरच्या नोंदवही मध्ये नोंदी करणेसाठी स्वयंसेवी संस्थाअथवा शैक्षणिकसंस्था तसेच सदर बाबतीत आवड असणाऱ्या व्यक्तींची निवड ग्राम स्तरावरुन करणे आवश्यक आहे. दिनांक 05 जून 1992 रोजी रिओ-दी-जानेरो येथे जैव विविधतेबददल जागतिक स्तरावरील परिषद झाली असून सदर संयुक्त राष्ट्र संघाच्या करारावर स्वाक्षरी झालेला भारतएक घटक देश आहे. सदर कायद्यांतर्गत भंग केल्यास त्यामध्ये शिक्षेची तरतुद करणेत आलेली आहे.

श्री. विवेक डावरे, वरिष्ठ संशोधक, समंत्रक तथा प्रभारी अधिकारी महाराष्ट्र  राज्य जैवविविधता मंडळ यांनी जैव विविधतेचा कायदा व त्या अंतर्गतस्थानिक स्वराज्य संस्थेमधील ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील समित्यांबाबत सविस्तर विवेचन केले. ग्राम स्तरावर जैव विविधतेच्या नोंदी करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणेचे आवाहन केले. ग्राम स्तरावरील जैव विविधतेच्या नोंदी बाबत गोपनीयता ठेवणे आवश्यक असलेचे नमुद केले.

मा. डॉ. विनोद सिंपले, प्राध्यापक,वनस्पतीशास्त्र विभाग,न्यु कॉलेज कोल्हापूर यांनी बायो डायव्हरसीटी अंतर्गत जगामध्ये असणाऱ्या संवेदनशील भागाच्याअंतर्गत भारतामध्ये एकुण 4 संवेदनशील भागाचा/क्षेत्राचासमावेश आहे. बायो डायव्हरसिटी अंतर्गत निसर्गातील सर्व घटकांचा योग्य तो समतोल राहणे व तो टिकविणेसाठी आपणसर्वांनी प्रयत्न करणेआवश्यक असलेचे नमुद केले.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी जैविक विविधताव्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीमध्ये मान्यवरांनी अत्यंत मोजक्या व अचुक शब्दांमध्ये सदर विषयाची मांडणी करुन सर्वांना माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे व महाराष्ट्र जैविक विविधता नियम 2008 अंतर्गत पंचायतराज व्यवस्थेतील ग्राम पंचायत स्तरावर सदरच्या समित्यांची स्थापना झालेली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरुन या बाबत शासन मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पुढील आवश्यक ती कार्यवाही करणेत येत आहे.

सदर जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्यासभेचे आयोजन ग्राम पंचायत विभागकडून करणेत आले. सदरच्या सभेचे प्रस्तावना व थोडक्यात माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांनी दिली. सदर बैठकीस मान्यवर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेडील विविध विभागांचे खातेप्रमुख, इतर संबंधित विभागाचे निमंत्रक, सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आपले मनोगत व आभार प्रदर्शन मानून मान्यवरांच्या परवानगीने सभा संपलेचे सांगितले.

 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)

जिल्हा परिषद कोल्हापूर

RTE २५ % विद्यार्थीप्रवेशप्रक्रिया 2018-19 अंतर्गतप्रवेशफेरीसमुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्तझाले आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे पहिल्या फेरीतील RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र 599 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 599 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 10/04/2018 पर्यंत एकूण 425 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. 106 विद्यार्थ्याचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेले असून अद्याप 68 अर्ज प्रलंबित आहेत. पहिल्या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 10/04/2018 होती. मात्र शासनाच्या निर्देशांनुसार व पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 13/04/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

(श्री.सुभाष रा.चौगुले)

 शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

 जिल्हा परिषद कोल्हापूर

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दिनांक 11/04/2018 इ.रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न झाली. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन श्री.निलेश म्हाळुंगेकर,अध्यक्ष महाराष्ट् राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना व श्रीम. जयश्री जाधव,विस्तार अधिकारी (शिक्षण) जिल्हा परिषद,कोल्हापूर यांच्या हस्ते करणेत आले. या प्रसंगी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.इंद्रजित देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. राहुल कदम, समाजकल्याण अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

या वेळी मा.श्री.इंद्रजित देशमुख अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलु व त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. श्री.बी.पी.माळवे यांनी महात्मा फुले यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर सामाजिक समता सप्ताह दिनांक 08 एप्रिल,2018 ते दिनांक 14 एप्रिल,2018 अखेर साजरा करणेबाबत शासन निर्णय दिनांक 04 एप्रिल,2018 नुसार विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणेबाबत सर्व कार्यालयानी कार्यवाही करणेकामी आवाहन करणेत आले.

 

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

श्रीलंका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट आणि गौरवोद्गार

श्रीलंका लर्निंग मिशन या संस्थेकडून सबरागुमवा प्रोव्हीन्सियल कौन्सिलचे प्रधान सचिव हेरथकुलरत्ने त्या कार्यालयाचे सचिव श्रीयानी पद्मलथा आयुक्त बी.ए.सी.पी. बामुनांराची, सहाय्यक आयुक्त डब्लू जी एन समन कुमरा व एल. एम. पी. डब्लू बंदरा या पाच उच्चपदस्थ्‍ अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट देउुन उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेउुन कोल्हापूर जिल्हा परिषदेने समाजाच्या विविध घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नाबद्रदल गौरवोद्रगार काढले तसेच हे सर्व उपक्रम आम्हाला अत्यंत प्रेरणादायक ठरणार असून आपण हे सर्व उपक्रम सबरागुमवा प्राव्हीन्सियल कौन्सिल मध्ये राबवू हे आम्ही उपक्रम राबवून झालेली प्रगती पाहणेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकारी यांनी यावे असे आवाहन केले.

सदर भेटीमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत जि.प. अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार साहेब यांनी केले. चर्चेमध्ये जि.प. सदस्या सौ. विजया पाटील, सौ. प्रा. अनिता चौगुले, सौ. आकांक्षा पाटील, सौ. पद्रमाराणी पाटील,  पं. स. सभापती सौ. रेश्मा सनदी, सौ. डॉ. स्नेहा जाधव, सौ. जयश्री तेली यांनी भाग घेतला. महिलांच्या प्रगतीसाठी श्रीलंकेमध्ये कोणते उपक्रम हाती घेतले याबाबत माहिती घेतली. श्रीलंकेच्या सबरागुमवा प्रोव्हिन्सियल कौन्सिल आणि श्रीलंका देशाबद्रदलचे सादरीकरण मुख्य सचिव हेरथ कुलरत्ने यांनी केले. जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी जिल्हा परिषदेच्या उपक्रमाबद्रदल आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट दिल्याबद्रदल या अभ्यासदौऱ्याबद्रदल अभिनंदन केले. सूत्र संचालन प्रा. संजय लोंढे यांनी केले. तर आभार अति. मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी मानले. तत्पूर्वी या अभ्यास दौरा सदस्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा घेउुन महिला उन्नतीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषद करीत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली.

या कार्यशाळेसाठी श्री. राजेंद्र भालेराव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जि.प. चे सर्व पदाधिकारी, जि.प. सदस्य, पं.स. चे सभापती, सदस्य, सरपंच, ग्रा,पं. सदस्य, जि.प. च्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच महाराष्ट् राज्यातील उच्च पदस्थ्‍ सौ. अनुवा कुंवर, श्री. दत्ता गुरव, श्री. चेतन वाघ, श्री. मालती सगणे, सुनंदा मांदळे, अजय देशमुख इ. उपस्थित होते.

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया घालवू नका – मा. शौमिका महाडिक, अध्यक्षा  जि प कोल्हापूर

7  ए्‌प्रिल 2018 रोजी जागतिक आरेाग्य दिना निमित्त आरोग्य देवता धन्वंतरी प्रतिमेचे पुजन मा शैमिका अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमनार उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना मा. अध्यक्षा म्हणाल्या की,  अन्नाचा कण आणि  आनंदाचा क्षण वाया  घालवू नका. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रसंगी बोलतांना म्हणाले की, आरोग्य विभागाने राष्ट्रीय मानांकन अनेक प्रा.आ.केंद्रासाठी प्राप्त केले आहे. तसेच प्रधानमंत्री  सुरक्षित मातत्व योजना,  प्रधानमत्री मातृवंदन योेजना ,  बेटी बचाव बेटी पढाव मध्ये चांगले काम केले आहे असे नमुद केले.

प्रास्ताविक डॉ उषादेवी कुभांर जि.आ.अ यानी केले या प्रसंगी बोलतांना जागतीक आरोग्य दिनांचे घोषवाक्य आहे- “Universal Health Coverage : Every One, Every Where.  त्यांचा मराठी अनुवाद आहे सार्वत्रिक आरोग्य सेवेची सुविधा, प्रत्येकासाठी , प्रत्येक ठिकाणी. आल्माआटा येथील जागतीक शिखर परिषदेमध्ये Health for All By  2000 AD  हा निर्णय 1986 साली झाला.  हे उदिदष्ट साध्य करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. 32 वर्षानंतर पुन्हा Universal Health Coverage  हे घोषवाक्य जागतीक आरोग्य संधटनेला घ्याव  लागल. कारण आरोग्यांच्य सुविधा प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी आजही उपलब्ध नाहीत. आजही दुर्गम भागात आदिवासी भागत शहरानजीकच्या आणि शहरातील अमर्याद वाढलेल्या झोपडपट्टी भागात सार्वत्रिक आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. प्राथमिक लसीकरणापासून  वंचीत असणारी अर्भके, प्रसुती सेवेसाठी तज्ञांची अनउपलब्धता, कुपोषणामुळे होणारे अर्भक मृत्यू हे चिंतेचे विषय आहेतच. त्या शिवाय लवकर निदान योग्य व पूर्ण उपचार न मिळालेने होणारे क्षयरोग मृत्यू, मधूमेह कर्करोग, हदयविकार, या सारख्‌े असांसर्गिक रोगांचे वाढते प्रमाण, किटकजन्य आजार अशी किती तरी आव्हाने आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेसमोर आहेत. चला सज्ज होवूया आणि एकजुटीने या अव्हानाचा मुकाबला करुया.  जनसेवाच्या या मंगलमय, पुण्यमय कार्यासाठी सर्व आरोग्य सेवा वितरकांना शुभेच्छा. आभार श्री  जोशी  यानी मानले

नेर्लीत युवा संस्थेच्या एचआयव्ही तपासणी 

गोरगरिबांच्यासाठी सार्वत्रिक आरोग्य सेवा दर्जेदार बनत आहेत. आरोग्यसेविका अनघा पाटील

उचगाव :- सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा, सर्वांसाठी ,सर्व ठिकाणी आरोग्य सेवा पोहचत आहेत.शासनाच्या वतीने सर्वसामान्य रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत म्हणून अनेक योजना राबविल्या जातात. अन्य आरोग्य विषयक योजनाचा लाभ रुग्णांनी घ्यावा दिवसेंदिवस  आरोग्य सेवा ही दर्जेदार रुग्णसेवा बनत चालली असल्याचे प्रतिपादन नेर्ली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या  आरोग्य सेविका अनघा पाटील यांनी केले.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्याने नेर्ली ता.करवीर  येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, युवा ग्रामीण विकास संस्था,स्थंलातरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प,महालॅब यांच्या वतीने महिला युवतीसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी युवा संस्थेच्या एचआयव्ही /एड्स जनजागृती प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहन सातपुते होते.  

यावेळी  जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य सेविका अनघा पाटील यांना  उत्कृष्ट  आरोग्य सेवेबद्दल पुरस्कार मिळाल्याबद्दल आशा स्वयं सेविकागरोदर माता स्तनदा मातांच्या वतीने  सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी करण्यात आली. यासाठी विकासवाडी नेर्ली,तामगाव येथील महिला ,युवती, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                       

 या शिबिरास सामाजिक कार्यकर्ती दिपाली सातपुते ,मंगल चव्हाण,शीला पाटील, विद्या मंदिर तामगावच्या नुरजहाँ मुलाणी,आशा गटप्रवर्तक  स्वाती कांबळे, आशा स्वयंसेविका जानकी गवळी, सरिता पाटील, संगीता कांबळे ,अर्चना मोरे,आक्काताई कांबळे, महालॅबच्या टेक्निशियन सीमा जाधव,ऋतुजा मांडरेकर, शुभम पाटील ,गणेश बारटक्के, प्रल्हाद कांबळेप्रदीप आवळे ,सचिन आवळे, हालसिद्धनाथ कांबळे, समुपदेशक जीवन मोहिते, डॉ.योगिता सातपुते, डॉ.सुहास राजमाने, डॉ.शीतल शेवाळे ,प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे याचे सहकार्य लाभले.

स्वागत  आभार अनघा पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन विद्या मंदिर नेर्लीचे समीर मुलाणी यांनी केले.

फोटो ओळ:-. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्याने नेर्ली ता.करवीर  येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, युवा ग्रामीण विकास संस्था,स्थंलातरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प,महालॅब यांच्या वतीने महिला युवतीसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले .यावेळी आरोग्य सेविका अनघा पाटील यांचा सत्कार करताना आशा स्वयंसेविका,नूरजहाँ मुल्लानी,शीला पाटील,आदी

किशोरवयीन मुली आणि पॅडमॅन – ज़िल्हा परिषदेचा उपक्रम

जिल्हा परिषदेमार्फत किशोरवयीन मुलींना पॅडमॅन चित्रपट शेा चे आयोजन

 (जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 535 मुलींनी  पाहीला चित्रपट)

 

मासिक पाळी व्यवस्थापन हा महिलांच्या,किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी निगडीत अत्यंत महत्वाचा विषय आहे. मात्र अद्याप ही या विषयाबाबत आपल्या समाजात खुलेपणाने बोलले जात नाही .या विषयाची जाणीव जागृती व्हावी  तसेच वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत जागृती व्हावी या उदद्ेशाने शासनाकडून सर्व जिल्हयामध्ये पॅडमॅन हा चित्रपट दाखविला जात आहे.त्यानूसार कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत मा.सौ.शौमिका महाडीक,अध्यक्षा,जि.प.कोल्हापूर आणि मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट आज  जि.प. शाळांमधील किशोरवयीन मुलींना दाखविण्यात आला.

महिलांचे आरोग्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी विशेषत: किशोरवयीन मुलींनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच या विषयाबाबत मुलींनी आपली आई,बहिण किंवा आपल्या शिक्षिका यांच्याशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे.असे मत मुलींना मार्गदर्शन करताना मा.अध्यक्षा यांनी मांडले.

या फिल्म शो दाखविण्याचा उदद्ेश स्पष्ट करताना मा.श्रीम.सुषमा देसाई,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पा.व स्व.),जि.प.कोल्हापूर म्हणाल्या की,मुली वयात येताना त्यांच्यात शारिरीक,मानसिक बदल होत असतात तसेच या काळात वैयक्तिक स्वच्छता महत्वाची असते आणि यासाठी शासनाने अस्मिता योजनेअंतर्गत या मुलींना माफक दरात सॅनिटरी पॅडची उपलब्ध केली आहे.या तीन बाबी मुलींपर्यंत पोहचणेस ही फिल्म मार्गदर्शक ठरेल.

यावेळी उपस्थित  शिक्षण व अर्थ समिती चे सभापती मा.श्री.अंबरिश घाटगे,महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मा.सौ.शुभांगी शिंदे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.इंद्रजित देशमुख यांचे आभार मा.श्री.सुभाष चौगले,शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांनी मानले.

या फिल्म शो साठी उपस्थित जिल्हयातील 535 मुलींनी हा चित्रपट पाहिला.जिल्हा शिक्षण बँकेमार्फत श्री.रेपे सर यांनी सर्व मुलींना अल्पोपहार उपलब्ध करून दिला .तसेच आयनॉक्स थिएटरचे व्यवस्थापक श्री.भिसे यांनी या शो चे व्यवस्थापन केले.या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष तसेच शिक्षण विभाग (प्रा.)यांनी केले .

———————————————————————————-

 

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद,कोल्हापूर

RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत प्रवेश फेरीस मुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्तझाले आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे पहिल्या फेरीतील RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र 599 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 599 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 28/03/2018 पर्यंत एकूण 300 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. 3 विद्यार्थ्याचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेले असून अद्याप 296 अर्ज प्रलंबित आहेत. पहिल्या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 31/03/2018 होती. मात्र शासनाच्या निर्देशांनुसार व पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 04/04/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

 

 

 

 

 

(श्री.सुभाष रा.चौगुले)

                                                        शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                        जिल्हापरिषदकोल्हापूर