शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत

 

संक्षिप्त माहिती शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत            

प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत खालील नमूद केलेल्या तालुकयामधील शाळा निर्लेखन करावयाच्या आहेत. संबधित लिलाव नोटीस व लिलावापासूनची सर्व कार्यवाही तालुकास्तरावरून होणार आहे. यासाठी लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पं. स., गटविकास अधिकारी पं. स, व उपअभियंता (बांधकाम ) पं. स.यांचेशी संपर्क साधावा.

 

अ.न. गटाचे नाव शाळेचे नांव निर्लेखन करावयाच्या शाळा खोली संख्या सरकारी किंमत एकूण तालुनिहाय सरकारी किंमत
1 करवीर वि.मं.कुमार गांधीनगर 3 व स्ंाधिी कुमार गांधीनगर   ता. करवीर  

09

 

39,110/-

 

39,110/-

संबधित गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता (बांधकाम), गटविकास अधिकारी यांनी इकडून प्रसिध्द केलेल्या दिनांकानंतर एक महिन्यामध्ये शासन नियमांनुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण करणेची आहे.

 

                                                   sd/-                                                 

                                     मुख्य कार्यकारी अधिकारी                               

                                      जिल्हा परिषद, कोल्हापूर

राजर्षि छत्रपति शाहू पुरस्कार वितरण समारंभ- दि.16 जुलै 2017

कोल्हापूर जिल्हा आणि छ.शाहू महाराज यांचे नाते अत्यंत दृढ आहे.  छ.शाहू महाराजांनी आपल्या अल्प कारकीर्दीत जे अलौकिक कार्य केले, ते सर्वांनाच सतत प्रेरणा देत राहिले आहे.  त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.  या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यन्त पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी सर्वच जण आपापल्या परीने कार्यरत असतात.  त्यांच्या प्रयत्नांना दाद म्हणून त्यांतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांना छ.शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2000 पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांमधून 5 व अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून 15 जणांची निवड त्यासाठी करण्यात येते.  पुरस्कारांसाठी निवड करतांना, सन्माननीय सदस्य यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कार्याचा विचार केला जातो.  कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 वर्षांची सेवा, गोपनीय अभिलेख, त्यांचे जनता, लोकप्रतिनिधी आणि सहकाऱ्यांशी असलेले साहचर्याचे नाते, याच बरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वा कलाक्षेत्रातही उल्लेखनीय योगदान असेल तर त्याचाही विचार करण्यात येतो.  अशा रीतीने पारख करून पुरस्कारांसाठी योग्य अशा सदस्य व कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा प्रयत्न होतो.

सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ  असे पुरस्काराचे स्वरूप असून, चालू वर्षीही 5 सन्माननीय सदस्य व 15 कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामानिमित्त, मा.ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  सदस्य व कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्याचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

विभागीय कार्यशाळेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कामाची प्रशंसा – विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी

 

मा.श्री.चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त, पूणे विभाग,पूणे यांनी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल उपक्रम राबविणेसाठी विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पूणे व सोलापूर या पाचही जिल्हा परिषदेमधील सर्व विभागात व सर्व पंचायत समिती मधील सर्व कार्यालयात यशस्वीपणे राबविणेसाठी शनिवार दिनांक -15 जुलै,2017 रोजी  मुख्य सभागृह विभागीय आयुक्त कार्यालय,पूणे येथे सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक,खाते प्रमुख्य,सर्व गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी व कक्ष अधिकारी,अधिक्षक यांची एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती.

मा.विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत दळवीसो यांनी सदर कार्यशाळेत त्यांनी यापूर्वी कार्यरत असतांना जिल्हाधिकारी, पूणे,सहकार आयुक्त, या ठिकाणी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल उपक्रम कश्या पध्दतीने राबविले याची सविस्तर माहिती  व  अभियान यशस्वी केलेची माहिती दिली, तसेच आता विभागीय आयुक्त कार्यालय पूर्ण व त्याअंतर्गंत सर्व जिल्हाधिकारी ते तलाठी कार्यालयापर्यंत व जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व कार्यालयात हे अभियान राबविणेबाबत पॉवर प्रेझेंटेशनव्दारे सादरीकरण करुन सविस्तर माहिती देवून उपस्थित केलेल्या शंकाचे सुध्दा निरसन केले.सदर अभियानाचा पहिला टप्पा हा अभिलेख वर्गीकरण अद्यावत करतांना   प्रलंबित कामाचा शोध घेवून  प्रलंबीत कामे निश्चित करुन  अभिलेख वर्गीकरण  अ,ब,क व ड मध्ये करुन अभिलेख कक्षामध्ये योग्य प्रकारे अभिलेखांची मांडणी दिनांक-31 जुलै 2017 पर्यंत पूर्ण करणेबाबत,तदनंतर प्रलंबित कामाची (संदर्भाची) निश्चिती करावी  व ते विहित कालावधीत निर्गत होणेकरीता नियोजन करणेबाबत सूचना दिल्या.

सदर कार्यशाळेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ सुंदर अभिलेख कक्ष अभियान हे एप्रील 2017 पासून जिल्हा परिषदेमधील सर्व विभागात व सर्व पंचायत समित कार्यालयात सुरु करणेत आले व याबाबत जिल्हा परिषदेने व पंचायत समितीने आतापर्यंत केलेल्या अभिलेख वर्गीकरणाची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पॉवर      प्रेझेंटेशनव्दारे कार्यशाळेत सादरीकरण केले तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र)      चंद्रकांत वाघमारे यांनी अभिलेख वर्गीकरण करतांना गठ्ठा कश्याप्रकारे बांधावा याबाबत व्हिडीओ क्लिपव्दारे सविस्तर माहिती दिली.

मा.विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद राबवित असलेल्या स्वच्छ सुंदर अभिलेख कक्ष कार्यालय अभियानाचे कौतुक करुन पुढील कामास शुभेच्या दिल्या. कार्यशाळेस कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) खातेप्रमुख्य, सर्वगटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी,कक्ष अधिकारी व अधिक्षक उपस्थित होते.

 

दिव्यांग बालकांसाठी मोफत साहित्य साधने वाटप व शिष्यवृत्ती गुणत्ताधारक विद्यार्थी सत्कार समारंभ

केंद्रशासनाच्यासर्वशिक्षाअभियानकार्यक्रमांतर्गतसमावेशितशिक्षणउपक्रमांतर्गतदिव्यांगविद्यार्थ्यांनाअनेकसुविधामोफतपुरविणेतयेतात.विशेषगरजाधिष्ठीतअसणायामतिमंद,बहुविकलांग,सेरेब्रलपाल्सी,अस्थिव्यंग,कर्णबधिरवअंधअसलेल्याविद्यार्थ्यांनासुलभपणेवर्गातबसतायेईल,शालेयपरिसरातवदैनंदिनपरिसरातकार्यकृतीकरणेकरीता,अध्ययनप्रकीयासुलभहोईलअशीआवश्यकसाहित्यसाधनेविद्यार्थ्यानासर्वशिक्षाअभियानअंतर्गतपुरविणेतयेतात.

सन2016-17मध्येकेाल्हापूरजिल्हयातीलप्रवर्गनिहायदिव्यांगविद्यार्थ्यांचीमोजमापशिबीरामधूनअलिम्कोतज्ञांमार्फततपासणीकरुनविशेषगरजाअसणा-या(दिव्यांग)561विद्यार्थ्यांना738साहित्यसाधनेनिश्चितकरणेतआलेलीआहेत. या साहित्यच्या वितरणाचा शुभारंभगुरूवारदिनांक 06 जुलै 2017 रोजीदुपारी 1.00 वाजताराजर्षिशाहूछत्रपतीसभागृहजिल्हापरिषद, कोल्हापूर येथे करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या जिल्हायतील 56 विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित  सत्कार करणेत आला. या संयुक्त कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक, उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. इंद्रजित देशमुख, शिक्षण व अर्थ समिती सभापती मा. श्री. अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मा. सौ. शुभांगी शिंदे,  जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. एल. एस. पाटील, डीआयईसीपिडी चे प्राचार्य मा. डॉ. विलास पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा. श्री. सुभाष चौगुले,  यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू  डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना निसर्गाने अन्याय न करता जे व्यंग दिलेले आहे त्या मोबदल्यात एक असामान्य शक्तीही दिलेली असते. या जाणिवेतून समाजातील घटाकांनी या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. त्या विद्यार्थ्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी  सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, व उच्च शिक्षा अभियानाच्या एकत्रित संयोगातून विकास साधता येईल असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रू.42 लाख किमतीचे साहित्य वाटप केलेचे सांगितले. कोल्हापूर जिल्हयाने शिष्यवृत्ती परीक्षेत 56 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थान पटकावलेचे सांगितले. यावेळी शिक्षण सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे, अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी आपल्या मनोगतात शिक्षण विभाग राबवित असलेले उपक्रम व शाळांची गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट केन, डायसी प्लेअर, सीपी चेअर, एम.आर. किट, व्हिलचेअर, श्रवणयंत्र, ब्रेल कीट या साहित्याचे वितरण करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करणेत आला.

 

शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                          जिल्हापरिषद,कोल्हापूर

————————————————————————————————————————————————

बाल न्याय अभियान कार्यशाळा बाबत

मुलांची काळजी व संरक्षण यासाठीच्या बाल न्याय अधिनियमासंदर्भात शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर व स्वाभिमानी बाल हक्क अभियान यांचेवतीने दि.०५/०७/२०१७ रोजी जुने सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विशेष कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मुलांचे हक्क आणि अधिकार या विषयी सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांना सविस्तर माहिती देणेत आली. मुलांच्या हक्काची जाणीव करुन देवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात नियमित करणेच्या व शाळाबाह्य विद्यार्थीविरहीत कोल्हापूर जिल्हा निर्माण करणेच्या उद्देशाने ही कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण व अर्थ समिती सभापती मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.श्री.सुभाष चौगुले, अवनिच्या उपाध्यक्षा मा.श्रीम. अनुराधा भोसले यांचेसह शिक्षण विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री.सुभाष चौगुले यांनी समाजातील शेवटचा विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी काम करणेचे तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देणेची गरज असलेचे स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार यांनी आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांना सुजाण नागरिक बनविण्यासाठी आत्तापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत नाही, मुले घरी सुरक्षित असतात असे गैरसमज दूर होवून पालक व समाज यांच्यामध्ये जाणीव जागृती करणेची गरज असलेचे सांगितले. शाळाबाह्य विद्यार्थीविरहीत कोल्हापूर जिल्हा निर्माण करण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणेचे आवाहन केले. यावेळी शिक्षण व अर्थ समिती सभापती मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे यांनी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्नांव्दारे सर्व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व जिल्हा परिषदेच्या शाळा समृद्ध करणेसाठी सहकार्य करणेचे आवाहन केले.

बाल न्याय अधिनियमासंदर्भात अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा मा.श्रीम.अनुराधा भोसले यांनी सविस्तर माहिती दिली. यामध्ये मुलांचे चार प्रकारचे अधिकार- जगण्याचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार, विकासाचा अधिकार व सहभागितेचा अधिकार तसेच शोषण व त्याचे प्रकार याबाबत मार्गदर्शन केले. विविध चित्रफितींव्दारे शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाबाबत केलेल्या कार्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन समिती व शिक्षण विभागाच्या सहकार्यामुळे वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणासाठी वाहतूक व्यवस्थेव्दारे नियमित उपस्थिती राखता आलेबाबत समाधान व्यक्त केले.

आभार उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री.बी.एम.कासार यांनी मांडले.

सदरची कार्यशाळा यशस्वी होणेकरिता श्री.डी.डी.कुंभार, श्री.बी.बी.पाटील, श्रीम.जे.एस.जाधव, श्री.व्ही.एस.वर्मा, श्री.आर.एम.धनवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

                                                                                                                                                शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                                                                जिल्हापरिषदकोल्हापूर

गरोदर माता, तिव्र – मध्यम कुपोषीत बालके व विकलांग रुग्ण यांच्याकडे पुरपरिस्थीतीत विशेष लक्ष देणार, तसेच आवश्यकता भासल्यास स्थलांतर करणार व साथरोग नियंत्रणासाठी कोल्हापूर जिल्हयातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज नागरिकांनी लाभ घ्यावा. – सौ. शौमिका महाडीक, अध्यक्षा, जि.प.कोल्हापूर

उपरोक्त विषयास अनुसरुन कोल्हापूर जिल्हयामध्ये पुरपरिस्थीती करीता आपत्कालीन व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करणेत आले आहे.

  • जिल्हास्तरावर डॉ कुणाल खेमनार, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आपत्कालीन कक्ष सुरु ठेवणेत आलेला असुन त्यामध्ये डॉ प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ यु जी कुभांर, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी व जिल्हा मुख्यालयातील 25 कर्मचारी 24 तास नियंत्रण कक्ष सुरु केला हा कक्ष 1 जुन ते 2 ऑक्टोंबर 2017 अखेर कार्यरत राहणार.
  • तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विस्तार अधिकारी आरोग्य, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक / सेविका, बी एन ओ, यांचा समावेश असुन हा कक्ष 24 तास कार्यरत करणेत आलेला आहे.
  • प्राथमीक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. आरोग्य सेवक / सेविका / सहायक यांच्यावरती जबाबदारी निश्चीत करणेत आलेल्या असुन त्यानुसार जिल्हास्तरावरुन सनियंत्रण करणेत येत आहे.
  • जिल्हयातील एकुण 129 पुरग्रस्त गावे व 210 जोखीमग्रस्त गावातील सर्वाना आपत्कालीन काळात औषधोपचार करणेबाबत पुर्ण नियोजन करणेत आले असुन त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.
  • संभाव्य पुरग्रस्त गावासाठी एकुण 59 वैद्यकिय अधिकारी, 64 आरोग्य सहायक, 85 आरोग्य सेवक, 103 आरोग्य सेविका असे मिळुन 311 अधिकारी कर्मचारी यांना पुरग्रस्त गावासाठी आदेशीत करण्यात आले आहे. तसेच आद्यावत वाहन व औषधे इत्यादी वैद्यकिय पथकात सामावेश करण्यात आलेला आहे. व अशा तयार केलेल्या पथकांची माहिती कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी पदाधिकारी व संबधित कार्यालये यांना देण्यात आलेली आहे.
  • प्रत्येक प्रा.आ.केद्रे व उपकेद्र स्तरावर आवश्यक तो जलजन्य व किटकजन्य औषध साठा पुरेशा प्रमाणात पाठविणेत आलेला असुन शासनाच्या मार्गदर्शनक सुचनानुसार साथरोग नियंत्रण किट अद्यावत करणेत आले आहे. तसेच संभाव्य पुरपस्थिती उदभवल्यस जिल्हयातील संपर्क तुटणाऱ्या प्रा.आ.केंद्र अंगर्तत गावासाठी अतिरिक्त दोन ठिकाणी अतिरिक्त औषधसाठा ठेवण्यात आलेला आहे.
  • पुरग्रस्त भागातील तिव्र जोखीम गट  –
अ.क्रं. तालुका बाळंतपणाची अपेक्षित तारीख जोखीम बालके अतिगंभिर रुग्णाची संख्या अपंग, पॅरालेसे, दिर्घकाळ अंथरुनात असणारी
जुन जुलै ऑगस्ट सप्टेंबर एकुण सॅम मॅम
1 भुदरगड 4 5 4 5 18 0 0 0
2 बावडा 3 6 2 3 14 0 0 0
3 पन्हाळा 18 20 17 12 67 0 3 0
4 शाहुवाडी 10 10 5 7 32 0 0 13
5 हातकणंगले 148 156 175 170 649 1 10 11
6 करवीर 45 104 116 112 377 4 3 7
7 कागल 44 34 30 46 154 2 14 112
8 शिरोळ 193 259 258 279 989 12 35 222
9 राधानगरी 18 21 14 17 70 0 0 6
कोल्हापूर 483 615 621 651 2370 19 65 371

वरील गटासाठी सर्व घटकांची वैद्यकिय अधिकारी आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत नियमित तपासणी करण्यात येऊन आवश्यकता भासल्यास तात्काळ पुरग्रस्त गावाबाहेर सुरक्षित स्थळी हलवणे बाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे.

  • पूरग्रस्त, संभाव्य पुरग्रस्त व संपर्क तुटणा-या गावंाना आरोग्य सेवक /सेविका,आरोग्य सहाय्यक/सहाय्यीका व वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत दैनंदिन भेट देवून साथीच्या रोगाचे रुग्ण निदर्शनास आलेस त्वरीत जागेवरच उपचार करणेत येणार आहेत. तसेच आरोग्य सेवक / सेविका व आरोग्य सहाय्यक / सहाय्यीका यांनी आपल्या भेटीत पिण्याचे पाणी ग्रामपंचायतीद्वारा नियमित शुध्दीकरण केले जाते किंवा नाही याची खातरजमा करुन रजिस्टरला नोदी घेवून संबधीत पाणी पुरवठा संस्थेला वस्तुनिष्ठ माहिती निदर्शनास आणून देऊन त्यावरील तंात्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
  • पुरग्रस्त गावासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कोल्हापूर यांचेकडील फवारणी पथकाची फवारनीसाठी आवश्यकता असेल त्यावेळी फवारणीची कारवाई करणेत येईल.
  • प्रत्येक वैद्यकिय पथकाकडे पुरेसा औषध साठा ठेवणेत येतो व ज्यात्या ग्रामपंचायतीकडे पुरेश्या प्रमाणात ब्लिचिंगपावडरचा साठा असलेची खात्री करणेत येते.
  • प्रा.आ.केंद्राचे कक्षेतील पुरग्रस्त गावात किंवा कोणत्याही साथीचा उद्रेक झालाच तर आपण प्रतिबंधात्मक उपचार युध्द पातळीवर करुन साथ आटोक्यात आनणेसाठी प्रयत्नशील राहणेत येते त्यासाठी आपल्या तालुक्यातील संपर्क अधिकारी व वैद्यकिय मदत पथक यांची जरुरीनुसार मदत घेणेसाठी संपर्क साधण्यात येतो.
  • पावसाळा सुरु होणेपुर्वी साथरोगाच्या दृष्टीने जोखमीच्या गावांना किमान महिन्यातुन एक भेट देवून परिस्थीतीचे अवलोकन वैद्यकिय अधिकारी यंाचे मार्फत करण्यात आलेले असुन योग्य पाठपुरावा करण्यात येत आहे.
  • प्राथमिक आरोग्य केद्रांचे वाहन यंत्रणा, साहित्य साधन सामुग्री सुसज्य ठेवणेत येते.
  • जिल्हयातील एकुण 34 ठिकाणी 108 आपत्कालीन आरोग्य सेवा पथक सुसज्ज ठेवण्यात आले आहे.
  • याशिवाय बाहय जिल्हयातील सांगली, बेळगाव इ. आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क ठेवुन भौगोलीक परिस्थीतीनुसार रुग्णावर उपचार करणेत येणार आहेत.

याव्यतिरिक्त पुरपरिस्थीतीमध्ये ग्रामीण भागातील नागरीकांना अडचण आलेस जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडील दुरध्वनी क्रमांक 0231-2661653 तसेच प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.

 

श्री सर्जेराव पाटील,

उपाध्यक्ष

जिल्हा परिषद कोल्हापूर

डॉ कुणाल खेमनार, (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापूर

सौ.शौमिका महाडीक,

अध्यक्षा

जिल्हा परिषद कोल्हापूर

डॉ प्रकाश पाटील,

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापूर

 

श्री चंद्रकांत वाघमारे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

 

श्री सर्जेराव पाटील,

सभापती

बांधकाम व आरोग्य

जिल्हा परिषद कोल्हापूर

——————————————————————————————————-

 

कृषि विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरद्वारे कृषि दिनानिमित्त्य  वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालेबाबत

मा. कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त्य  कृषि विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत आज कृषि दिन संपन्न झाला. सदर कार्यक्रमानिमित्त्य मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील यांच्या शुभ हस्ते  मा. कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. तसेच मा. नाईक यांच्या कार्याविषयी मा. इंद्रजीत देशमुख साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे व्याख्यान झाले. सदर कार्यक्रमाकरिता विभागीय कृषि सहसंचालक मा. डॉ. एन. टी. शिसोदे  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा. श्री. बसवराज मास्तोळी यांच्या सोबत जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी तस्ेाच कर्मचारी उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद जुन्या इमारतीच्या आवरात वृक्षारोपण कार्य्रकम घेणेत आला. मा. अध्यक्ष सौ शौमिका अमल महाडिक, मा. उपाध्यक्ष श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील , मा. श्री. विशांत सुरेश महापुरे सभापती समाजकल्याण, मा.श्री राहुल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी सभापती हातकणगले राजेश पाटील, मा. इंद्रजीत देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. चंद्रकांत सुर्यवंशी कृषि विकास अधिकारी, मा. चंद्रकांत वाघमारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी   (सा. प्र.)  मा. राजेंद्र भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी  ( ग्रा. पं. ) मा. श्री. सतिश रोकडे जिल्हा कृषि अधिकारी  मा. दिनेश वरपे जिल्हा कृषि अधिकारी  यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

Sd/-

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक पदाची भरती

 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा  परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक  पदाची भरती