शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद प्रज्ञाशोध निकाल परीक्षा जाहिर सन 2017-18

 

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जि.प.स्वनिधीमधून प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेमध्ये राधानगरी तालुक्याने वर्चस्व संपादन करुन जिल्हा यादीमध्ये प्रथम स्थान मिळविलेले आहे. मराठी माध्यमामध्ये राधानगरीची विद्यार्थिनी कु.प्रतिक्षा यादव इ.7 वी मध्ये प्रथम तर भुदरगडचा विद्यार्थी कु.शिवतेज खोपडे इ.4 थी मध्ये प्रथम आला आहे. तसेच उर्दू माध्यममध्ये इ.7 वी मध्ये कागल तालुक्यातील मान्नोली अश्फाक तर इ.4 थी मध्ये हातकणंगले तालुक्यातील गडकरी जेबा हे विद्यार्थी प्रथम आले आहेत. जिल्हास्तरीय अनु. प्रथम तीन विद्यार्थ्यांना रक्कम रु.5,000/-, 3000/-, 2,000/- बक्षीस, चषक व प्रमाणपत्र देणेत येवून त्यांचा गौरव करणेत येणार आहे. मार्गदर्शक शिक्षकांना पदक व प्रमाणपत्र प्रदान करणेत येणार आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जि.प.स्वनिधीमार्फत दरवर्षी मुलांच्या अंगी स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होण्यासाठी तसेच इ. 5 वी इ. 8  वी च्या परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. इ.4 थी व इ.7 वी मध्ये शिकणाऱ्या मराठी व उर्दू माध्यमातील मुलांच्यासाठी ही परीक्षा आयोजित केली होती. चाळणी परीक्षा व निवड परीक्षा अशा दोन टप्प्यांमध्ये परीक्षेचे आयोजन करणेत आलेले होते. परीक्षा परिषदेच्या निकषांनुसार भाग 2 मधील गुण (इंग्रजी व बुद्धिमत्ता) व जन्मतारीख हे निकष वापरुन जिल्ह्यातील प्रथम तीन व तालुक्यातील प्रथम दहा विद्यार्थ्यांची निवड करणेत आलेली आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडणेकामी मा.जि.प.अध्यक्षा सौ.शोमिका महाडिक, उपाध्यक्ष मा.सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण सभापती मा.अंबरिषसिंह घाटगे व इतर जि.प.सदस्य यांचे योगदान लाभले आहे.

 

(श्री.सुभाष चौगुले)

शिक्षणाधिकारी (प्राथ.),

जिल्हा परिषद कोल्हापूर