राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती  मोठया उत्सवात साजरी.

कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती दि. 02/10/2017 रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न झाली. याप्रसंगी प्रतिमेचे पुजन        मा. डॉ. हरिश जगताप, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. श्री. राजंेद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./सा.प्र.) जिल्हा परिषद, कोल्हापूर यंाचे हस्ते करणेत आले.

त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. डॉ. हरिश जगताप यांनी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्वच्छता स्पर्धेत देशात पहिला क्रमांक मिळवून गांधीजींच्या विचारांचे पाईक झाल्याचे नमूद केले. याप्रसंगी श्री. बी.पी. माळवे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची सविस्तर माहिती सांगितली.महात्मा गांधी जयंतीचे औचित्त्य साधून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे वतीने जिल्हा परिषदेच्या परिसरात स्वच्छता मोहिम सकाळी 8 ते 10 यावेळेत राबविणेत आली. या मोहिमेमध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश जगताप,Áश्री.निवास पाटील,श्री.तुषारबुरुड(कार्यकारीअभियंता),श्री.बी.एस.मिसाळ(शाखा अभियंता)व,श्रीसेवेचे 100 सदस्य सहभागीझाले होते.êकार्यक्रमास श्री.संजयअवघडे(कक्षअधिकारी),श्री.नारायणचांदेकर(अधिक्षक)व जिल्हा परिषद कर्मचारी मोठ्याü संख्येंने उपस्थिती होते.

 

                                                                                            सही/-

                          

उप मुख्य कार्यकारी अधिकारी,(साप्र.)

                                                                      जिल्हा परिषद, कोल्हापूर