राजमाता जिजामाता यांची ४२० वी व स्वामी विवेकानंद यांची १५५ वी जयंती साजरी केलेबाबत.

 

राजमाता जिजामाता यांची ४२० वी व स्वामी विवेकानंद  यांची १५५ वी जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १२/०१/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. डॉ. हरिष जगताप, प्रकल्प संचालक (डीआरडीए) व मा. श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री. दत्तात्रय केळकर, अधिक्षक सामान्य प्रशासन व सौ. प्रतिमा पाटील, कनिष्ठ सहाय्यक (ग्रापापु) यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले. यावेळी मा. श्री. बंडा माने (जि.प. सदस्य) यांनी राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद  यांचे विषयी माहिती सांगितली. याप्रसंगी मा. डॉ. हरिष जगताप, प्रकल्प संचालक यांनी मार्गदर्शन केले.

राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सांगितली.

यावेळी मा. श्री. राहुल कदम, उपमुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी, मा. श्री. सोमनाथ्‍ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, कृषि अधिकारी, श्री. डॉ. संजय शिंदे, पशु संवर्धन अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

तरी सदरची बातमी आपलेमार्फत जिल्हयातील लोकप्रिय दैनिकांतून प्रसिध्द करणेत यावी.

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर