प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली  व निवडे  ची राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र तपासणी करीता निवड. . . . .

जिल्हायातील 18 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महाराष्ट शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत गुणवत्ता आश्वासन उपक्रम राबविण्यात येत असून त्यापैकी माहे फेबुवारी 2017 मध्ये राज्य गुणवत्ता आश्वासन कक्षाव्दारे 9 प्राथमिक आरोग्य केंद्राची राज्यस्तरीय गुणवत्ता आश्वासन पथकाकडून तपासणी करण्यात आलेली होती.

ü 9 प्राथमिक आरोग्य केंद्रामधून प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे चिखली याना राज्यस्तरीय गुणवत्ताआश्वासन प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. या संदर्भात राज्यस्तरावरुन कोल्हापूर जिल्हा परिषद, आरोग्य विभागाला पञ पाठवून कळविण्यात आलेले आहे. या मानांकना करीता प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहा विभागाची तपासणी करण्यात येते. प्रामाणपत्र प्राप्त करण्या करीता प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात येणारी आरोग्य सेवा, संसर्ग नियंञण, इमारत साधन सामुग्री, सहाय्यभूत सेवा तसेच अंतर-बाहय संस्थेची तपासणी करण्यात येते. वैद्यकिय अधिकारी कर्मचा-यानी राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्रा करीता स्थानिक पातळीवर पूर्तता करणे अपेक्षित असते परिक्षणा नंतर गुणाच्या आधारावरुन राज्यस्तरीय परिक्षकाच्या अहवालावरुन प्रमाणपत्र जाहीर केले जाते.

आता निवडे चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रांची राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र तपासणी करीता निवड करण्यात आलेली आहे. असे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी नमुद केले.

दिनांक 21 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये  मा. श्री  प्रदिप व्यास, प्रधान सचिव आरोग्य विभाग यांच्याकडून प्रमाणपत्र प्रधान करण्यात आले. या प्रसंगी मा डॉ. संजीव कुमार, आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान , डॉ मयुरी संके, भारत सरकार सल्लागार, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार  डॉ. धारुरकर, उपसंचालक, कोल्हापूर मंडळ कोल्हापूर   जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. प्रकाश पाटील हे उपस्थित होते.

या 2 प्राथमिक आरोग्य केंद्राना प्रमाणपत्र मिळण्याकरीता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार व जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. प्रकाश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

 

 

आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर