प्राथमिक आरोग्यकेंद्र निवडे व चिखली यांची राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यामध्ये निवड

कोल्हापूर जिल्हयामध्ये गुणवत्ता आश्वासन उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय मानांकनाकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे ता. गगनबावडा व चिखली ता. कागल या 2 प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झालेली होती. जिल्हयातील 18 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गुणवत्ता आश्वासन गटाद्वारे 2 प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात आलेली होती. या संदर्भात राष्ट्रीयस्तरावरुन कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाला पत्र पाठवून कळविण्यात आलेले आहे. या उपक्रमाअंतर्गत आरोग्य संस्थेमधील सहा विभागाची तपासणी करण्यात येते. या विभागातील संबधीत विविध बाबीची तपासणी करण्यात येते. वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यानी राष्ट्रीय गुणवत्ता मुल्याकंना करीता स्थानिक पातळीवर पुर्तता करणे अपेक्षित असते व परिक्षणानंतर गुणाच्या आधारावरुन व परिक्षकाच्या अहवालावरुन मानांकन जाहीर केले जाते. या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.
या 2 प्राथमिक आरोग्य केंद्राना प्रमाणपत्र मिळण्याकरीता मा. सौ. शौमिका महाडीक, अध्यक्षा जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. सर्जेराव पाटील (पेरीडकर) सभापती बांधकाम व आरोग्य समिती, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, अति. जि.आ.अ. डॉ. यु.जी. कुंभार, जि.मा.बा.स.अ. डॉ. एफ. ए. देसाई यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले तसेच कार्यक्रमाकरीता आवश्यक पुर्तता जिल्हा गुणवत्ता आश्वासन गटामार्फत डॉ. स्मिता खंडारे, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक श्री. मंदार विनवडे व कार्यक्रम सहाय्यक श्री. विलास हराळे यांनी केले आहे.

आपलास्नेहाकिंत

जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर