डॉ आनंदीबाई जोशी पुरस्कार व अधिकारी कर्मचारी सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न्

डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व अधिकारी कर्मचारी सत्कार कार्यक्रम जिल्हा परिष्‍देच्या राजर्षी शाहु छत्रपती सभागृह येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका अमल महाडिक यांच्या हस्ते संपन्न्‍ झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. सतिश्‍ पत्की होते. जिल्हा परिषदेचे मु.का.अ. मा. कुणाल खेमनार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आरोग्य व बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव बंडू पाटील, अर्थ व शिक्षण सभापती मा. श्री. अंबरिषसिंह घाटगे, माहिला व बालकल्याण सभापती सौ.शुभांगी शिंदे, आरोग्य समिती सदस्या मा. सौ. सुनिता रेडेकर, मा. सौ. सुनिता भाटळे, मा. सौ. शिल्पा पाटील, मा. सौ. पुष्पा रेडेकर, बांधकाम समिती सदस्य श्री. हंबीरराव पाटील, डॉ. पी.पी. धारुरकर, उपसंचालक कोल्हापूर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना मा. शौमिका महाडिक यांनी पुरस्कार विजेत्या आरोग्य संस्थाचे, तसेच सत्कार करण्यात येणा़-या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच महिलांना आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष्‍ दयावे. तसेच आहार, चांगल्या सवयी व वैद्यकीय सल्ला  या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.

मा. कुणाल खेमनार यांनी बोलतांना म्हाणाले की, योजना अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. तसेच कुठलेही काम करीत असतांना सकारात्म अपेक्षा ठेवल्यास कोणतेही काम चांगले होते.

प्रसिध्द स्त्री रोग तंज्ञ डॉ. सतिश पत्की यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्हयात होणा़-या सर्व गरोदर माता, स्तनदा माता , बालक यांचे डिजीटल रेकॉर्ड उपलब्ध्‍ असते, सर्व प्रसुती रुग्णालयात होत आहे. बालकांच्या वाढीसाठी आवश्यक घटक मातेच्या दुधात असल्यामुळे स्तनपान महत्वाचे आहे. हे निर्सगाचे ’स्वीच ओवर मेकॅनिझम’  आहे असे नमुद केले.

सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या प्रकारे सेवा दयावी व पुरस्कार मिळावावे असे प्रतिपादन आरोग्य व बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव बंडू पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांनी केले. कार्यक्रमासाठी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे, उपस्थित होते. कार्यक्रम नियोजन  व आभार प्रदर्शन डॉ एफ ए देसाई,   यांनी केले.