ग्रामपंचायत मुडशिंगी येथे स्वच्छता ही सेवा अभियानास शुभारंभ

आमदार मा.अमल महाडीक यांच्या स्वच्छता  श्रमदानातून अभियानास प्रारंभ

कोल्हापूर 16/9/2017

आज रोजी ग्राम पंचायत मुडशिंगी,ता.करवीर येथे आमदार मा.अमल महाडीक यांचे उपस्थितीत स्वच्छता हि सेवा अभियानाचा शुभारंभ करणेत आला. सुरवातीला शालेय मुलांचे मार्फत स्वच्छता फेरी काढणेत आली. या सोबत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता रथाच्या माध्यमातुनही प्रबोधनपर संदेश देण्यात आले. प्रभात फेरी नंतर स्वच्छता मोहिम घेणेत आली. यामध्ये आमदार मा. अमल महाडीक यांचेसोबत ग्रामपंचातयीचे पदाधिकारी ग्रामस्थ यांनी देखील हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. यानंतर उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपत घेतली.

घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनांतर्गंत ग्रा.प. मुडशिंगीचा शिवाजी विद्यापिठाच्या तंत्रज्ञान विभागाकडून सर्व्हे केला जाणार आहे. यासाठी हे सर्व विध्यार्थी व प्राद्यापक मुडशिंगी येथे उपस्थित होत. या विध्यार्थ्यांना आमदार मा. अमल महाडीक यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्लास्टीकचा वापर न करणेबाबत उपस्थितांना आवाहन केले. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवून जिल्हयासाठी रोल मॉडेल म्हणुन गाव तयार व्हावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर आधारित तयार केलेले स्टिकर्स मा. आमदार साहेब यांचे शुभहस्ते काही घरावर लावण्यात आली.

या अभियान शुभारंभासाठी मा. श्रीम. सुषमा य.देसाई ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) ,जि.प. कोल्हापूर, मा. श्री. सचिन घाडगे गविअ. करवीर तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ ,सल्लागार व समुह समन्वयक ,ग्रा.प. सरपंच ,उपसरपंच ,पदाधिकारी व ग्रामसेवक इ. उपस्थित होते.