कोल्हापूर जिल्हयातील सर्व शाळांमध्ये होणार ‘स्वच्छता मतदान ’

कोल्हापूर जिल्हयातील सर्व शाळांमध्ये होणार ‘स्वच्छता  मतदान 

जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वच्छता मतदान उपक्रम राबविणार- जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.शौमिका अमल महाडीक.

प्रस्तावना:-

  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेमध्ये पाणी व स्वच्छता विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मतदान 2017 हा उपक्रम दि.2 ऑक्टोबर 2017 रोजी इयत्ता 4 थी ते 8 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला जाणार आहे.

उपक्रम:-

संपूर्ण देशभरात दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत ‘þ֓”ûŸÖÖ हि ÃÖê¾ÖÖ’ अभियान राबविले जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर विविध स्वच्छता विषयक उपक्रमांच्या माध्यतातून स्वच्छतेची जनजागृती केली जात आहे. यातीलच एक उपक्रम म्हणून दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी स्वच्छता मतदान हा शालेय विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.

उद्देश:-

शालेय विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती होणेबरोबरच स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच स्वच्छते विषयीचे त्यांचे मत मांडता यावे यासाठी स्वच्छता मतदान घेतले जाणार आहे.

पुर्वतयारी:-

स्वच्छता मतदान उपक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हास्तरावर सर्व गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख यांची विशेष नियोजन बैठक दि. 26/9/2017 रोजी संपन्न झाली आहे. तसेच दि.28/9/2017 रोजी तालुका स्तरावर सर्व केंद्र प्रमुखांची नियोजन बैठक आयोजित करून उपक्रम यशस्वी होण्यासाठी योग्य त्या सुचना दिल्या आहेत.

मतपत्रिका स्वरूप:-

स्वच्छता मतदानासाठी आठ प्रश्नांची मतपत्रिका निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये स्वच्छतेविषयक प्रश्नांची विचारणा करण्यात आलेली आहे. या प्रश्नांच्या पूढे त्यासाठी सुचक चिन्ह नमूद केलेले असुन त्यापूढे होय किंवा नाही या अर्थाची खुण विद्यार्थ्यांने नमूद करावयाचे आहे. मतदान प्रक्रियेची सर्व जबाबदारी शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक यांचेवर सोपविण्यात आलेली आहे.

सहभागी विद्यार्थी संख्या:-

जिल्ह्यातील एकूण 2002 जि.प. शाळामधील इयत्ता चौथी ते आठवीच्या वर्गातील 89,171 विद्यार्थी स्वच्छतेबाबतचे आपले मत या मतदानातून देणार आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप:-

सर्व शाळामध्ये दि. 2 ऑक्टोबर 2017 रोजी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

  • सकाळी ठिक 00 वा महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रम सूरवात.
  • सकाळी 30 मि. बाल सभेचे आयोजन व मतदान प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सर्वसाधारण माहिती देणे.
  • सकाळी 00 वा. प्रत्यक्ष स्वच्छता मतदान प्रक्रिया.
  • सकाळी 00 प्रभातफेरी व स्वच्छता मोहिम तसेच मतमोजणी सकाळी 11.00 वा. संबधित शाळेत.
  • निकाल केंद्र प्रमुखांकडे विहीत प्रपत्रात केंद्र प्रमुखांकडे सादर करणे दूपारी 00.
  • दि. 3 ऑक्टोबर 2017 रोजी तालुकास्तरावर निकाल तयार करणे व जिल्हा स्तरावर सादर करणे.

स्वच्छता मतदान 2017 हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडीक व मुख्य कार्यकारी अधिकारीसोा मा. डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

—————————————-