आरटीई २५ % अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता राज्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील शासनाने निर्धारित केलेल्या वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन राबविणेत येणार आहे.

सदर प्रवेश प्रक्रिया खालील वेळापत्रकाप्रमाणे राबविणेत येणार आहे.

अ.क्र. कालावधी करावयाची कार्यवाही
1 13/02/2019 ते 22/02/2019 आर.टी.ई. प्रवेशपात्र सन 2018-19 च्या Auto Forward केलेल्या शाळांचे आणि नवीन नोंदणी केलेल्या शाळांचे BEO कडून Verification करणे.
2 25/02/2019 ते 11/03/2019 सामाजिक वंचित घटक / आर्थिक दुर्बल घटक / घटस्फोटीत तसेच विधवा महिला / अनाथ बालके / दिव्यांग बालके इ. घटकांतील पालकांकडून ऑनलाईन प्रवेश अर्जभरणे.
3 14/03/2019 ते 15/03/2019 पहिली सोडत (लॉटरी) काढणे.

 

वरील वेळापत्रकानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी (अल्पसंख्यांक शाळा वगळता) ऑनलाईन नोंदणी करावी व पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केलेले आहे.

 

 

                                                                शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                        जिल्हापरिषद,कोल्हापूर