स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज (उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेसोबत महसूल विभाग ही सहभागी होणार )

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव -2017 साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मा.श्री.अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी,कोल्हापूर ,मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हयामध्ये वर्ष 2015-16 पासून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू झाला.या उपक्रमाचे आता चळवळीमध्ये रूपांतर झाले असून कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांनी पर्यावरण रक्षण आणि पंचगंगा प्रदूषणाचे गांर्भीय लक्षात घेवून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमाच्या माध्यामातून वर्ष 2015-16 मध्ये 182442 इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले तर 916 ट्रॉली निर्माल्य दान करण्यात आले.तसेच वर्ष 2016-17 मध्ये देखील 235889 इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले आणि 1322 ट्रॉली निर्माल्य दान करण्यात आले.

या वर्षी ही दि.25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर,2017(घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव) मध्ये होणा-या गणेशोत्सवासाठी देखील याचं पध्दतीने  स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा,यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत हा उपक्रम राबविला जात होता यावर्षी महसूल विभागाने ही सक्रिय घेवून अभियान यशस्वी करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तर  ü कोणताही जलस्त्रोत प्रदुषित होणार नाही यासाठी  पंचगंगा प्रदुषणांतर्गत येणा-या गावांसोबत इतर सर्व गावांमध्ये ही एक गावं,एक गणपती(सार्वजनिक गणेशोत्सव) संकल्पना राबविणे,ग्रामस्थांना शाडूच्या गणेशमुर्तीं घेण्याबाबत आवाहन करणे,निर्माल्य नदीत विसर्जन न करणे आणि गणेश मूर्ती संकलन  याबाबत ग्रामस्तरावर प्रबोधनासाठी गृहभेटींचे आयोजन करणे, संकलित मूर्ती कुंभारांनी परत घेण्याबाबत आवाहन करणे,गणेशमूर्ती विसर्जनासाठी व निर्माल्य विसर्जनासाठी ग्रामस्तरावर पर्यायी  ü व्यवस्था उपलब्ध करणे याबाबत गावनिहाय नियोजन करणेबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना सूचना दिल्या.

या नियोजन बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी,उपविभाग,गट विकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,तहसिलदार,उपअभियंता,(ग्रा.पा.पु.) गट समन्वयक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ,सल्लागार उपस्थित होते.

———————————————————————————————

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद,कोल्हापूर