FaceBook Like

सुजाण विध्यार्थी अभियान २०१७ वृत्त प्रसिद्ध करणेबाबत

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सुजाण विद्यार्थी अभियान २०१७ 

 कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत जिल्हयातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांमध्ये सन 2017-2018 या शैक्षणिक वर्षात “डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सुजाण विदयार्थी अभियान”  राबविणेत येत आहे. सदर अभियानांतर्गत ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या व्यक्तीमत्वावर विविध पैलू पाडून सर्वांगिण विकासासाठी व सभोवतालच्या सर्व आवश्यक विषयांची प्राथमिक माहिती विद्यार्थ्याना मिळावी याकरिता हे अभियान राबविणेत येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळामधील सर्व विद्यार्थ्याना विविध विभागाची माहिती चित्रफितीच्या व माहिती पटाच्या आधारे देउन एक सुजाण विद्यार्थी घडविण्याचा उद्देश असून जिल्हा परिषद शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा एक सुजाण व सक्षम विद्यार्थी म्हणून बाहेर पडेल यात शंका नाही. त्या अनुषंगाने विविध विभागांच्या चित्रफिती व माहिती पुस्तकांचे वाटप दिनांक 14/11/2017 रोजी सकाळी 11.00 वा  राजर्षी शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे संपन्न झाले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी केले. या कार्यक्रमामध्ये श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत विविध विषयांचे चित्रफिती देणेकरिता तालुका स्तरावरील केंद्रप्रमुखांना लॅपटॉपची सुविधा देणेत येणार असलेचे सांगितले. मा.डॉ.कुणाल खेमनार ,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंगातून शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांना घडविण्याची ऊर्जा कशी निर्माण होऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले. मा.डॉ.डी.टी. पोवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर विभाग ,कोल्हापूर यांनी अध्यात्मातून शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या प्रकाश वाटेकडे सुरक्षित प्रवास या स्वलिखित पुस्तकाच्या रु. 3.00 लाख किंमतीच्या 2050 प्रति जिल्हा परिषदेच्या शाळांना वितरीत करणेत आल्या. वन विभागाच्यावतीने प्रभूनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक अधिकारी, कोल्हापूर वन विभाग, कोल्हापूर यांनी जैवविविधतेवर आधारित चित्रफित जिल्हा परिषदेच्या 1250 शाळांना  निशुल्क वाटप केल्या.

सदर कार्यक्रमात चित्रफित तयार करणाऱ्या व पुस्तक भेट देणाऱ्या सर्व विभागांचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.सर्जेराव पाटील, मा.डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.अंबरिषसिंह घाटगे सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जिल्हा परिषद कोल्हापूर, श्री.भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद कोल्हापूर, श्री.सुभाष चौगुले शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, कोल्हापूर, यांच्या उपस्थित प्रमाणपत्र, पुस्तक व पुष्प देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालन श्री.संदीप मगदूम यांनी केले. जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी, श्री.डी.सी. कुंभार, श्री.जे.टी. पाटील, श्री.एम.आय. सुतार व सौ. जे.एस.जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे आभार श्री.बी.एम.कासार ,उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी मानले.

 

(सुभाष चौगुले)

                                                                                                                     शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                                                                                    जिल्हा परिषद कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
September
SMTuWThFS
      1
2345678
910111213
 • All day
  2018.09.13

  No additional details for this event.

1415
1617181920
 • All day
  2018.09.20

  सर्वांना मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा….

2122
23
 • All day
  2018.09.23

  अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.

242526272829
30      
अभ्यागत
60,818