FaceBook Like

शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (क) नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांमध्ये अपंग, अ.जा., अ.ज., वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गात (प्रथम प्रवेश स्तरावर) 25 टक्के प्रवेश राखीव ठेवणेची तरतूद आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील RTE अंतर्गत 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी कोल्हापूर जिल्हयातील नोंदणी केलेल्या 347 शाळांमधील 3501 जागांसाठी दि. 10/02/2018 ते दि. 07/03/2018 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेत आलेले आहेत. प्रत्यक्षात सदर कालावधीत एकूण 246 शाळांसाठी 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 70 शाळांसाठी 25 % आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत. अशा खालील 70 शाळांसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेचे आयोजन मंगळवार         दि. 13/03/2018 इ. रोजी दुपारी ठिक 1.00 वाजता शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे करणेत आलेले आहे.

सदर लॉटरी प्रक्रियेस खालीलप्रमाणे नमूद केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व सदर शाळांमध्ये प्रवेश घेणेसाठी अर्ज केलेल्या पालकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सुभाष रा. चौगुले शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या शाळांची यादी

अ.क्र. तालुका शाळेचे नाव
1 हातकणंगले लोकनेते राजारामबापू पाटील इंग्शिल स्कूल, कोरोची
2 हातकणंगले कौतुक विद्या मंदिर शिरोली
3 हातकणंगले आयडीयल इंग्लिश स्कूल शिरोली
4 हातकणंगले सिंबोलिक इंटरनॅशनल स्कूल शिरोली पुलाची
5 हातकणंगले नवजीवन विद्यानिकेतन शिरोली
6 हातकणंगले संकल्प वि.मं. शिरोली
7 हातकणंगले जिनियस इंग्शिल मिडीयम स्कूल पेठवडगांव
8 हातकणंगले ग्रीन व्हॅली प्रायमरी पब्लिक स्कूल पेठवडगांव
9 हातकणंगले गुरूकुल प्राथमिक विद्यालय पेठवडगांव
10 हातकणंगले आयडीयल इंग्लिश स्कूल इचलकरंजी
11 हातकणंगले अनंतराव भिडे वि.मं. (इंग्रजी)
12 हातकणंगले श्री बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
13 शिरोळ आचार्य आदीसागर इंग्लिश स्कूल उदगांव
14 शिरोळ श्री दत्त बालक मंदिर शिरोळ
15 शिरोळ गुरूकुल इंग्लिश मिडीयम स्कूल अब्दुललाट
16 शिरोळ न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल जयसिंगपूर
17 करवीर अविष्कार इंग्लिश स्कूल पाडळी खुर्द
18 करवीर लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूल
19 करवीर दूधगंगा व्हॅली सेमी इंग्लिश स्कूल इस्पुर्ली
20 करवीर श्री आनंदराव पाटील (चुयेकर) इंग्लिश मिडीयम स्कूल
21 करवीर रॉयल इंग्लिश स्कूल उचगांव
22 करवीर ज्ञानकला विद्यानिकेतन उचगांव
23 करवीर मॉडर्न इंग्लिश स्कूल पाचगांव
24 राधानगरी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल राधानगरी
25 राधानगरी वक्रतुंड इंग्लिश मिडीयम स्कूल
26 कागल सेंट ॲनेस इंग्लिश मिडीयम स्कूल
27 भुदरगड आयडीयल इंग्लिश स्कूल शिंदेनगर (राणेवाडी)
28 गडहिंग्लज बी. आर. चव्हाण इंग्लिश स्कूल
29 गडहिंग्लज हलकर्णी भाग इंग्लिश मिडीयम स्कूल
30 गडहिंग्लज विश्वनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल गडहिंग्लज
31 चंदगड सेंट स्टिफन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चंदगड
32 कोल्हापूर शहर छ. शाहू विद्यालय प्रायमरी
33 कोल्हापूर शहर छ. शाहू विद्यालय सी.बी.एस.ई.
34 कोल्हापूर शहर मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल
35 कोल्हापूर शहर सेंट ॲन्थोनी स्कूल
36 कोल्हापूर शहर श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी प्रायमरी
37 कोल्हापूर शहर श्री दत्ताबाळ इंग्लिश मिडीयम स्कूल
38 कोल्हापूर शहर न्यू मॉडेल इंग्शिल स्कूल
39 कोल्हापूर शहर कोरगांवकर इंग्लिश मिडीयम स्कूल
40 कोल्हापूर शहर भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर
41 कोल्हापूर शहर संजीवन इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल
42 कोल्हापूर शहर सृजन आनंद विद्यालय
43 कोल्हापूर शहर श्रीपतराव बोंद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल
44 कोल्हापूर शहर विकास विद्यामंदिर प्राथमिक
45 कोल्हापूर शहर एम. एस. पटेल इंग्लिश स्कूल
46 कोल्हापूर शहर श्री हनुमंतराव चाटे स्कूल (इंग्रजी)
47 कोल्हापूर शहर ओरीएंटल इंग्लिश ॲकॅडमीज प्रायमरी स्कूल राजारामपुरी
48 कोल्हापूर शहर टॅरीयर शौर्य स्कूल
49 कोल्हापूर शहर राधाबाई शिंदे इंग्लिश मिडीयम स्कूल
50 कोल्हापूर शहर सेंट मॅरीज स्कूल
51 कोल्हापूर शहर राणेज प्रायमरी स्कूल
52 कोल्हापूर शहर न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल
53 कोल्हापूर शहर ब्ल्यू बर्ड इंग्लिश स्कूल
54 कोल्हापूर शहर प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
55 कोल्हापूर शहर अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल
56 कोल्हापूर शहर कोल्हापूर इंग्लिश स्कूल
57 कोल्हापूर शहर अभिनव विद्यामंदिर
58 कोल्हापूर शहर ॲड. पी. आर. मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल
59 कोल्हापूर शहर जवाहर इंग्लिश स्कूल
60 कोल्हापूर शहर विमला गोयंका इंग्लिश स्कूल
61 कोल्हापूर शहर श्री वसंतराव जयवंतराव देशमुख प्रायमरी इंग्लिश स्कूल कोल्हापूर
62 कोल्हापूर शहर आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल
63 कोल्हापूर शहर कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूल
64 कोल्हापूर शहर आदर्श प्रायमरी स्कूल
65 कोल्हापूर शहर पोदार इंटरनॅशनल स्कूल
66 कोल्हापूर शहर विमल इंग्लिश स्कूल
67 कोल्हापूर शहर श्री हनुमंतराव चाटे स्कूल (मराठी)
68 कोल्हापूर शहर साई इंग्लिश स्कूल
69 कोल्हापूर शहर रॉयल इंग्लिश मिडीयम स्कूल उचगांव
70 कोल्हापूर शहर कोल्हापूर पब्लिक स्कूल

 

सदर लॉटरी प्रक्रियेबाबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकामधून प्रसिध्दी देणेत यावी, जेणेकरून पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना सदर दिवशी नियोजित ठिकाणी हजर होणे सोयीचे होईल.

 

 

 

(श्री. सुभाष रा. चौगुले)

                                                                                  शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                            जिल्हा परिषद कोल्हापूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
March
SMTuWThFS
    123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
अभ्यागत
visitors total