सामान्य प्रशासन विभाग, जि.प.कोल्हापूर
राजर्षि शाहू छत्रपती पुरस्कार प्राप्त जि.प./पं. स. सदस्य वैशिष्ट पुर्ण कामकाज माहिती
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
- नांव – श्री. हंबीरराव केशव पाटील, जि.प.सदस्य,
- मतदार संघ –सरुड, ता.शाहुवाडी
- वैशिष्टपुर्ण कामे –
- सन 1997-2002 सदस्य ग्रा.प. भेडसगांव,
- सन 2002-2007 सदस्य.पं.स. शाहूवाडी,
- सन 2002-2005 उपसभापती पं.सं.शाहूवाडी,
- सन 2007-2012 सदस्य जि.प कोल्हापूर,
- 2010-2012 सदस्य जिल्हा नियोजन समिती,
- कोल्हापूर. 2000 – आजपर्यंत संचालक, विश्वास सह. साखर कारखाना चिखली.ता.शिरोळ,
- 2017-ते पुढे सदस्य जि.प कोल्हापूर,
- 1988- आजपर्यंत संस्थापक चेअरमन, भेडसगांव ना.सह.पतसंस्था असे विविध पदांचा सामाजिक कार्यासाठी उपयोग करुन जनकल्याणाची अनेक कामे मार्गी लावली आहेत.
- शाहूवाडी तालूक्यांतील सरुड या दुर्गम, डोंगराळ जि.प मतदार संघामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी, समाजकल्याणच्या शासनाच्या अनेक योजना तळागळातल्या, वंचित घटकांपर्यंत पोहचविल्या आहेत.सामाजिक कार्यात मिळालेल्या सर्व पदांचा वापर सामाजिक बांधिलकीच्या कार्यासाठी केला असून शासनाचा कोटयावधी रुपयांचा विकासनिधी खेचून आणून लोककल्याणाची गुणात्मक व दर्जेदार अनेक विकासकामे केली आहेत.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नांव – दलितमित्र श्री अशोकराव माने (बापू) जि.प.सदस्य,
- मतदार संघ – शिरोळ, ता. शिरोळ
- वैशिष्टपुर्ण कामे –
- संस्थापक चेअरमन- देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी लि,जयसिंगपूर
- संस्थापक चेअरमन- छत्रपती शाहू को-ऑप इंडस्ट्रियल इस्टेट लि.शिरोळ जि.कोल्हापूर
- संचालक- ऑल इंडिया स्पिनिंग मिल्स फेडरेशन ऑफ जि.मुंबई
- स्वर्गीय माजी पंतप्रधान मा.राजीवजी गांधी यांच्या हस्ते भारत सरकारच्या नॅशनल युथ ॲवार्ड नवी दिल्ली 1987-88.
- स्वर्गीय माजी मुख्यमंत्री मा.विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनचा दलितमित्र पुरस्कार सन
- सन 2004 मध्ये अखिल भारतीय संहिता अकॅडमी मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप ॲवार्ड प्राप्त.
- सन 2013 दि.ओपन इंटरनॅशनल युनिव्हरसिटी मेंबरशिप फॉर कंप्लीमेंटरी मेडिशिन्स कोलोंबो (श्रीलंका) या आंतरराष्ट्रीय विदयापीठाची डॉक्टरेट पदवी.
- जिल्हा परिषदेच्या सदस्य असून गेली 35 वर्षे तळागळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत जावून त्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मौजे आगर येथे राजर्षी छत्रपती शाहू औदयोगीक वसाहतीची स्थापणा करुन 3000 लोकांना स्वयंरोजगार व रोजगार दिले असून आदर्श अशी संस्था चालवून उदयोगजगांचे व रोजगाराचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्हात मिलसाईट तमदगले स्थापन करुन पाचशे ते सहाशे लोकांना सदया काम दिले आहे. व एक आदर्श व अत्याधूनिक यंत्रसामुग्रीनी परिपूर्ण अशी व जागतीक परिमाणानुसार उत्तम सूत निर्माण करुन ऑल इंडिया स्पिनिंग मिल फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सह. वस्त्रोदयोग महासंघाचे पारितोषिक प्राप्त आहे. शिरोळ-जयसिंगपूर येथील 50 एकर परिसरात व दोन ते अडीच हजार लोकांना हाताला काम देणारी संस्था संस्था केली आहे.
————————————————————————————————————————————————————————————————————————-
- नांव – श्री. बजरंग ज्ञानू पाटील, जि.प.सदस्य,
- मतदार संघ – असळज, ता. गगनबावडा.
- वैशिष्टपुर्ण कामे –
- सामाजिक कार्य :- गगनबावडा तालुक्यातील हरीत क्रांतीला चालना देण्यासाठी पाणी साठवण करणे गरजेचे होते. गगनबावडा तालुका हा पर्जन्याचा अतिवृष्टीचा तालुका तात्कालीन खासदार कै. बाळासाहेब माने व आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून अणदूर लघु प्रकल्प साकारण्याकरिता जमीन संपादन व त्यासंबधी प्रक्रियेत सहभागी होऊन पुढाकार घेतला. या पाण्याच उपयोग गगनबावडा तालुक्या बरोबर पन्हाळा व करवीर तालुक्यालाही झाला आहे. तलावातुन वाहते पाणी सायपन पध्दतीने गावातील शेतक-यांना बारमाही उपलब्ध करुन दिले आहे. या तलावाने गावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्या बरोबर मोठया प्रमाणात जमीन ओलीता खाली आली आहे.
- अणदुर-धुंदवडे रस्ता :- गगनबावडा तालूक्यातील धामणी खोरा कोल्हापूर गगनबावडा मुख्य रस्त्याला जोडणे नितांत गरजेचे होते. पावसाळयात आरोग्याची सुविधा मिळणे दुरापास्त होते. यासाठी अणदुर धंुदवडे रस्ता होणे गरजेचे होते. आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील याच्या माध्यमातून व सहकार्यातून आज हा रस्ता डांबरीकरणाचा केला आहे. यामूळे दोन्ही खोरी एकमेकांना जोडली आहे.
- इतर सुधारणा:- अणदुर गावच्या सार्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहे. गावातील ग्रामदेवतांचे मंदिरे बांधली आहे. प्राथमिक शाळेची इमारत सुसज्ज तसेच क्रिडांगण उपलब्ध करुण देण्यात महत्वाचा सहभाग आहे. गावाचे गावपण कायम जोपासण्यात सहभाग नोंदवला आहे.
- इतर जि.प/पं.स सदस्य म्हणूण केलेले कार्य:- सन 1992 ते 1997 जिल्हा परिषद स्विकृत सदस्य म्हणून काम पहिले असून जिल्हा परिषद सर्वत्रिक निवडणूक 2017-2022 या निवडणूकीत कॉग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून विजयी. सदया विदयमान जिल्हा परिषद सदस्य व कृषी समिती सदस्य म्हणून काम पहात आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नांव – प्राध्यापिका, अनिता सोमाण्णा चौगुले जि.प.सदस्य,
- मतदार संघ – बडयाची वाडी, ता. गडहिंग्लज
- वैशिष्टपुर्ण कामे –
- शैक्षणिक अर्हता – एम.ए(इंग्रजी), एम.ए.(समाजशास्त्र),एम,एड, डी.एस.एम
- प्राध्यापिका – रावसाहेब कित्तूरकर ज्युनि.कॉलेज(जागृती)गडहिंग्लज, कोल्हापूर
- संस्थापक अध्यक्ष – अनमोल चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज, कोल्हापूर
- शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या मुली- सन 2014 पासून 02 मुलिंच्या इ.10 वी पर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी
- वैद्यकिय शिबिराचे आयोजन – अनमोल चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज मार्फत मुक बधिर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकिय शिबिाराचे आयोजन.
- व्यक्तिमत्व विकास शिबिर – अनमोल चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज मार्फत परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सात दिवसांचा व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले.
- वृक्षारोपण अभियान :- दीप इंग्लिश मेडियम स्कूल दुंडगे, गडहिंग्लज येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. रावसाहेबआण्णा कित्तुरकर ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथे प्रकल्प कार्य म्हणून एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला.
- अंधश्रध्दा निर्मुलन:- प्रबोधनपर एकांकिकेत मुख्य भुमिका विविध प्रात्याक्षिके जळता कापूर खाणे, विस्तवावर चालणे इ.
- सुत्र संचालन:- विविध कार्यक्रमांत गेली 25 वर्षे प्रभावी व यशस्वी सूत्र संचालनाचे कार्य.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नांव – सौ.उज्ज्वला उत्तम पाटील, उप सभापती पन्हाळा
- पं.स.मतदारसंघाचे नाव- सातवे पंचायत समिती मतदारसंघ
- वैशिष्टपुर्ण कामे –
- पं.सं.सदस्यांनी केलेले कार्य – अ) सामाजिक कार्य – सातवे गावातील दारुबंदी करण्याकरीता महिलांच्या मध्ये प्रबोधन करणे करीता शिबीरे, प्रबोधन रॅली काढुन ऐतिहासिक दारुबंदिमध्ये एक महत्व पुर्ण भुमिका बजावली तसेय गावठाण व शाळा येथे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करीता सुरु असलेल्या वृक्षदिंडी, वृक्षवाटप, प्रबोधन शिबीरे करीता तीन ते चार वर्षे काम केली.
- सांस्कृतीक कार्यक्रम – सातवे पं.स.मतदारसंघातील आर्थिकदृष्टया दुर्बल विदयार्थ्यांना वहया , गणवेश व दप्तर वाटप करणे विदयार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीसे देणे.
- पंचायत समिती उपसभापती म्हणून राबवलेल्या योजना -1) शिवणयंत्र, ताडपत्री, चापकटर, सौर कंदिल, झेरॉक्स मशीन, दळप कांडप गिरण व शेत अवजारे वाटपकरणे. 2) गाळ मुक्त तलाव व जलयुक्त तलाव 3) जलयुक्त शिवार योजना 4) हागणदारीमुक्त गाव योजना 5) रमाई आवास योजना 6) प्रधानमंत्री आवास योजना 7) मुक्त गोटा प्रोत्साहान योजना
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री. दिनकर पांडुरंग घुले,
- हुद्दा – अधीक्षक, आरोग्य विभाग जि.प.कोल्हापूर
- शिक्षण – 12 वी
- नो.सु.दिनांक – 18/10/1984
- वैशिष्ट्य पुर्ण कामे –
- राज शिष्टाचार कामकाज यशस्वीरित्या करण्याची क्षमता
- मा.विभागीय आयुक्त तपासणी शक पुर्तता 100 टक्के
- 2- सामान्य प्रशासन ऑडीट परिच्छेद 100 टक्के
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी /मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी तपासणी शक पुर्तता.
- खाते प्रमुख यांचे मुल्यमापन अहवाल यशस्वीपणे पुर्ण करणे.
- अभिलेख वर्गीकरण कामकाज.—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री रविंद्र भुजिंगा कांबळे
- हुद्दा – वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती शिरोळ
- शिक्षण – एम.ए.
- नो.सु.दिनांक – 20/12/1989
- वैशिष्ट्य पुर्ण कामे –
- सन 2005 मध्ये हातकणंगले तालुक्यात पुरग्रस्त परिस्थिती महत्वपुर्ण कामकाज ग्रामपचांयत विभागाकडील प्रशासकिय कामकाज उत्कृष्ठ,तालुक्यातील सर्व ग्रामसेवकाचे पंचायत राज सेवार्थ प्रणाली मधील वेतन देयके बिनचुक
- सर्व लेखाशिर्षा खालील कर्मचा-यांचे वेतन निश्चिती ग्रामपंचायत विभागाशी निगडीत जनहिताच्या विविध योजनामुदतीत पुर्तता व लाभ, ग्रामपंचायत विभागाकडील आस्थापना विषयक सर्व बाबींची पुर्तता, ग्रामसेवकांची सर्व सेवापुस्तके आद्यावत,पेन्शन प्रकरणे, सेवा निवृती नंतरच्या सर्व लाभांची प्रकरणे मुदतीत पुर्तता, वेतन निश्चितीतसेच जात पडताळणी प्रकरणांची पुर्तता,दरमहा 1 तारखेस पगारहोणे बाबत प्रयत्न व पुर्तता सर्व राष्ट्रीय कामकाजा मध्ये सहभाग
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
कर्मचा-याचेसंपुर्ण नाव :- श्री. दयानंद राजाराम पाटील
- सध्याचे पद :- कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती गडहिंग्लज
- शिक्षण :- एम.ए.
- नोकरी सुरू तारीख :- 15/04/1999
- वैशिष्टे पुर्ण कामे –
- सर्व प्रशासकिय कामकाज उत्कृष्ठ, पंचायत राज सेवार्थ प्रणालीसाठीतालुक्याचा मास्टर ट्रेनर म्हणून कामकाज पाहून पंचायत राज सेवार्थ प्रणाली मधील वेतन देयके बिनचुक व वेळेपुर्वी सादर. सर्व लेखाशिर्षा खालील कर्मचा-यांचे वेतन निश्चिती
- कार्यालयाशी निगडीत जनहिताच्या विविध योजना मुदतीत पुर्तता व लाभ, आस्थापना विषयक सर्व बाबींची पुर्तता, सर्व सेवापुस्तके आद्यावत, पेन्शन प्रकरणे, सेवा निवृती नंतरच्या सर्व लाभांची प्रकरणे मुदतीत पुर्तता, वेतन निश्चितीतसेच जात पडताळणी प्रकरणांची पुर्तता, दरमहा 1 तारखेस पगारहोणे बाबत प्रयत्न व पुर्तता सर्व राष्ट्रीय कामकाजा मध्ये सहभाग.
- हगणदारी मुक्तीसाठीपथकामध्ये भाग घेऊनहगणदारी मुक्ती पथकास सहाकार्य. वृक्ष लागवड व स्वच्छतेसाठी सहभाग.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री. प्रकाश रमेश इंदुलकर
- हुद्दा – वाहन चालक पंचायत समिती पन्हाळा
- शिक्षण – 10 वी पास
- नो.सु.दिनांक – 1/4/1992
- वैशिष्ट्य पुर्ण कामे –
- तालुक्याचे निर्मलग्राम मध्ये सातत्य राखणेसाठी अधिका-यासोबत वेळोवेळी काम करुन निर्मल ग्राममध्ये सातत्य राखणेसाठी मोलाचा सहभाग.
- आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पुरस्थितीमध्ये पुरांचे ठिकाण अधिकारी यांना वेळेत पोहोचणे या कार्यत्परता दाखवली.
- श्री तिर्थ क्षेत्र जोतीबा यात्रा व श्रावण शष्टी यात्रेच्या वेळी उत्कृष्टरित्या कामकाज
- वाहनचालक म्हणून विनातक्रार कामकाज आजअखेर
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री. दत्तात्रय मारुती सलगर
- हुद्दा – परिचर, सामान्य प्रशासन विभाग, जि.प.कोल्हापूर
- शिक्षण – 10 वी पास
- नो.सु.दिनांक – 27/2/2004
- वैशिष्ट्य पुर्ण कामे –
- सन 2005 मधील महापूरामध्ये शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त लोकांच्या जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणेच्या कामकाजा मध्ये मोलाचे योगदान.
- आज्ञाधारक, प्रामाणिक कार्यतत्पर , कर्तव्यदक्ष कर्मचारी परिचर म्हणून कार्यरत
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री. संतोष जयसिंग पोवार
- हुद्दा – विस्तार अधिकारी(पंचायत), पंचायत समिती करवीर
- शिक्षण -बी. एस्सी (ऍग्री)
- वैशिष्ट्य पुर्ण कामे –
- पं.स.शिरोळ कडे कार्यरत असतेवेळी नेमुन दिलेल्या 26 ग्राम पंचायतींचे निर्मल ग्राम करण्यात आल्या. सर्व ग्राम पंचायती पर्यावरण संतुलीत समृद्धी योजने मध्ये पात्र करण्यात आल्या. 6 ग्राम पंचातींना विकास रत्न पुरस्कार प्राप्त झाला. ग्रा.प. नृसिंहवाडी उत्कृष्ट यशवंत ग्राम पंचायत पुरस्कार व विभागात प्रथम क्रमांक व देश पातळीवर हि पुरस्कार प्राप्त.
- पं.स.करवीर कडे कार्यरत असतेवेळी नेमुनदिलेल्या सर्व ग्रा.प.चे ओ.डी.एफ़. करण्यात आल्या. 14 वीत्त आयोग आराखडा तयार करुन 100% खर्च केला.
- करवीर व शिरोळ कडील लेखा शक पुर्तता पुर्ण केली आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री. मायाप्पा शामराव शिणगारे
- हुद्दा – विस्तार अधिकारी(कृषी),पंचायत समिती गगनबावडा
- शिक्षण – com(Hon), कृषी पदविका
- नो.सु.दिनांक – 06/01/1994
- वैशिष्ट्य पुर्ण कामे –
- विशेष घटक / जि.प.सेस फ़ंड इ.कामाचे 100% उद्दीष्ट पुर्तता
- वनराई बंदारे 100% उद्दीष्ट पुर्तता ü
- सन 2014 मध्ये आदर्श शासकिय अधिकारी म्हणुन गगनगिरी फ़ैाडेशन पुरस्काराने सन्मानित
- सन 2016 मध्ये आनंदी कला क्रिडा संस्थेचा आदर्श शासकिय अधिकारी पुरस्काराने सन्मानित.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री. विलास शंकर तराळ
- हुद्दा – शाखा अभियंता, पंचायत समिती कागल
- शिक्षण – C.EFRC., B.A.
- वैशिष्ट्य पुर्ण कामे –
- दिनांक 6/6/1993 रोजी बांधकाम उप अभियंता पंचायत समिती पन्हाळा येथे पन्हाळा येथे रुजू झालो. सद्या पं.स.कागल येथे कार्यरत आहे.
- तालुक्यातील दुर्गम भागात नविन रस्त्याचा सर्व्हे रस्त्याची नविन बांधणी, पुरग्रस्त भागात अतिवृष्टीमुळे लोकांना स्थंलातर करणे, इ. कामे हिरहिरीने केली आहेत.
- याबरोबरच प्रधानमंत्री सडक योजना , यशवंत ग्रामसमृध्दी योजना व आरोग्य केद्राकडील प्रा.आ.केद्राचे बांधकामे डोंगरी विकास व आमदार फंड इ. मधील विकास कामे करुन घेतली.
- जिल्हा परिषद वार्षिक क्रिडा स्पर्धेत धावणे, क्रिकेट, खो खो खेळामध्ये भाग घेवून विजेता झालो आहे. तालुका अभियंता संघटनेचा प्रतिनिधी तसेच जि.प.तांत्रिक पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून काम करीत आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री.वसंतराव यदू गाडे
- हुद्दा – सहाय्यक लेखाधिकारी,वित्त विभाग,जि. प. कोल्हापूर
- शिक्षण – COM
- वैशिष्ट्य पुर्ण कामे –
- सन 1994 मध्ये जिल्हा निवड मंडळामार्फत वरिष्ठ सहा लेखा म्हणून शिक्षण विभाग प्राथमिक येथे नेमणूक झाली.
- पंचायत समिती गगनबावडा दुर्गम भागात 5 वर्षे सेवा केली असून पंचायत समिती चंदगड मध्ये 6 वर्षे सेवा केली. सदया वित्त विभागात सहाय्यक लेखाधिकारी पदी उत्कृष्ठ कार्य करीत आहेत.
- वित्त विभागात बजेट करणे कामी महत्तपुर्ण भूमिका बजावले आहे. 12 पंचायत समिती व मुख्यालय यंाचे समन्वयाने जिल्हा परिषदेचे मासिक लेखे व वार्षिक लेखे अदयावत व परिपुर्ण केले आहे. सन 1962-63 पासूनची अनामती व तसलमात वसूलीबाबत विशेष प्रयत्न केले आहेत. वित्त विभागाकडील सर्वच कार्यासनास बहुमोल मार्गदर्शन केले आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
नाव – श्री.सचिन काशिनाथ माने.
- हुद्दा – पशुधन पर्यवेक्षक,पशु वैद्यकीय दवाखाना शिरगाव ता राधानगरी
- वैशिष्ट्य पुर्ण कामे
- पशु वैद्यकिय सेवेतुन ग्राम समृद्धी योजने अंतर्गत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
- 20 मे पशुसंवर्धन दिन या कार्यक्रमात उत्कृष्ट क्षेत्रिय पशुर्वद्यक पुरस्कार मिळाला आहे,
- शतकोटी वृक्ष लागवड , पशुधन विमा योजना, जागतीक अंडी दिन, ॲझोला प्रात्यक्षिक जनावरांना लसिक्रण व जंत निर्मुलन, जनावरांचे आरोग्य शिबीर, वैरण बियाणे ठोंब वाटप इ. उपक्रम चांगल्या प्रकारे राबविले आहेत.
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
कर्मचारी नाव :- श्री.संजय बाबूराव सोनवणे,
- हुद्या :- आरोग्य सेवक (पु), आरोग्य विभाग, जि.प.कोल्हापूर
- शिक्षण :- 12 वी एम.पी.डब्ल्यु कोर्स
- नोकरी सुरु दिनांक :- 12.2003
- वैशिष्ठ पूर्ण कामे
- जिल्हास्तरावरुन पल्स पोलीओ कार्यक्रमांचे पर्यवेक्षण 100% केले
- वैद्यकिय देयकांना तांत्रिक मंजूरीचे कामकाज
- साथरोग नियंत्रण बाबत शासनस्तरावरून वेळोवेळी आवश्यक सर्व कामकाज
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
कर्मचारी नाव :- श्रीम. आशाराणी दादासो गायकवाड
- हुद्या :- आरोग्य सेवक (म), प्रा.आ.केंद्र. टाकळी ता.शिरोळ,
- शिक्षण :- एस.एस.सी.ए.एन.कोर्स
- नोकरी सुरु दिनांक :- 08.2006
- वैशिष्ठ पूर्ण कामे.
- प्रत्येक वर्षी कुटुंब कल्याण उद्दीष्ट 100% पुर्ण
- 2013 मध्ये उपकेंद्र टाकळी मध्ये 33 प्रस्तुती मा.जिल्हा आरेाग्य अधिकारी यांचेकडून अभिनंदन
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
कर्मचारी नाव :- श्री. विनायक अनंत काटकर,
- हुद्या :- आरोग्य पर्यवेक्षक, ता.आ.अ.कार्या. पं.स.आजरा,
- शिक्षण :- बी.एस.सी.एम.पी.डब्ल्यु.
- नोकरी सुरु दिनांक :- 02.1999
- वैशिष्ठ पूर्ण कामे –
- कुटुंब कल्याण अंतर्गत, राष्टीय कृष्टरोग, क्षयरोग, हिवताप , साथरोग समन्वय व जनजागृती
- पल्स पोलीओचे तालुकास्तरावरुन उल्लेखनिय कामकाज,
- माताबाल संगोपनाचे कामकाज,
- लिंग गुणात्तर प्रमाण नियंत्रण कामकाजजिल्हास्तरावरुन पल्स पोलीओ कार्यक्रमांचे पर्यवेक्षण 100% पुर्ण
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
कर्मचारी नाव :- श्रीम. छाया सुभाष जाधव
- हुद्या :- आरोग्य सहाय्यक (म), प्रा.आ.केंद्र.-भुये ता. करवीर,
- शिक्षण :- एस.एस.सी.ए.एन.कोर्स
- नोकरी सुरु दिनांक :- 02.1986
- वैशिष्ठ पूर्ण कामे
- 1987-88 करवीर पं.स.रौप्य महोत्सवा निमित्त तृत्तीय क्रमांक,
- ऑगस्ट 1990 मध्ये आदर्श उपकेंद्र निवड राज्य स्तरीय मुल्यमापन व्दितीय क्रमांक
- 2000-01 कुटंुब कल्याण कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय व्दितीय क्रमांक
—————————————————————————————————————————————————————————————————————————-
कर्मचारी नाव :- श्री.जयप्रकाश नारायण लोले ü
- हुद्या :- औषध निर्माण अधिकारी, प्रा.आ.केंद्र.हुपरी ता. हातकणंगले
- शिक्षण :- एच.एस.सी. डी.फार्मा
- नोकरी सुरु दिनांक :- 04.2003
- वैशिष्ठ पूर्ण कामे –
- 2013-14 राष्ट्रीय कृष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमामध्ये उत्कृष्ठ कामाबद्यल पुरस्कार.
- 2014-15 मध्ये आनंदीबाई जोशी पुरस्कार,
- ई-औषध प्रणाली अद्यावतपुरस्कार,
- सन 16-17 मध्ये प्रा.आ.केंद्र हुपरीस NABH राष्ट्रीय मानांकन मिळणेस कामकाज सहभाग,सामान्य प्रशासन विभाग, जि.प.कोल्हापूरराजर्षि शाहू छत्रपती पुरस्कार प्राप्त जि.प./पं. स. सदस्य वैशिष्ट पुर्ण कामकाज माहिती
- ——————————————————————————————————————————————————————————————————————–