जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये एकूण १४ विभाग आहेत .त्यापैकी महिला व बालकल्याण विभाग हा महत्वाचा विभाग आहे.महिला व बाल कल्याण समितीची स्थापना १९९२-९३ मध्ये झाली सदर समिती मार्फत शासन व जिल्हापरिषदेकडील प्राप्त होणा-या अनुदानातून गरीब ,विधवा,परित्यक्ता, घटस्फोटीत,देवदासी व अर्थिकदृष्टया कमकुवत घटकातील तसेच मागासवर्गीय महिला यांना त्यांच्या शैक्षणिक व अर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्त्रीया ख-या अर्थाने सबल होण्याच्या दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार वैयक्तीक व सामुहिक योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.
मासिक प्रगती अहवाल
शासन निर्णय
महिला व बालकल्याण सर्वसाधारण माहिती
राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान नियोजित नावीन्यपुर्ण उपक्रम
१) इलेक्ट्रॉनिक वजन काटा :-जिल्हयांतर्गत ग्रामपंचायतकडील १० टक्के महिला बाल कल्याण निधी, पंचायत समिती सेस फंड, लोकसहभागाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकंाची अचूक वजने घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे उपलब्ध करुन घेणे. तसेच जुन्या वजन काटयांचे कॅलिबे्रशन करुन घेण्याचे नियोजन करुन घेण्यात आले आहे.
२) बालकांचे पोषण श्रेणी बाबतचे कार्ड :- जिल्हयांतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रातील SUM / MUW / SAM / MAM बालकांचे आरोग्य पोषण कार्ड तयार करुन त्यांची आरोग्य तपासणी, लसीकरण, प्रत्येक महिन्यातील वाढ-घट, श्रेणीतील बदल आहाराची वारंवारता याबाबतच्या नोंदी घेणे व त्याचा पाठपुरावा करणे.
(more…)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
7,073 total views, 7 views today