महिलांसाठी आरोग्य शिबीर

कोल्हापूर जिल्हा परिषद, महादेवराव महाडिक फौंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी, ग्रामपंचायत मोरेवाडी, रंगनाथ हॉस्पीटल, तसेच देवराई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर ग्राम पंचायत मोरेवाडी येथे आयोजित करणेत आले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.शौमिका अमल महाडिक यांचे शुभ हस्ते करणेत आले. महिला ही सतत घरातील इतरांसाठी राबत असते. जोपर्यंत मोठा  आजार होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करीत असते. ही मानसिकता महिलांनी आता बदलली पाहिजे व महिलांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यामागचा मूळ हेतू असा होता की, काही प्राथमिक आजार हे पहिल्या टप्प्यातच निदर्शणास यावेत यासाठी विविध ठिकाणी या पुढेही महिलांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करणेत येणार आहे याचा सर्व महिलांनी  लाभ घेणेत यावा असे आवाहन मा.अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांनी या प्रसंगी केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे, डॉ. प्रविण हेंद्रे, डॉ. सौ. अनुराधा सामंत, करवीरचे प्र.गट विकास अधिकारी श्री. भोसले, श्री. दत्तात्रय भिलुगडे, सौ.स्मिता हुदले, श्री. मनोज बागे, श्री. आशिष पाटील, आरोग्य सहाय्यक कर्मचारी व मोरेवाडी भागातील मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

 

 

One Response to महिलांसाठी आरोग्य शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व घडामोडी
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2017 >
November
SMTuWThFS
   1234
 • All day
  2017.11.04

  गुरुनानक जयंतीच्या शुभेच्या!!!!!!….

567891011
121314
 • All day
  2017.11.14

  पंडित जवाहरलाल नेहरूंची आज जयंती. बालदिन म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो

15161718
19202122232425
262728
 • All day
  2017.11.28

  महात्मा जोतीबा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० साली झाला..

2930  
अभ्यागत
visitors total