पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

राष्ट्रीय लसीकरण मोहिमे अंतर्गत कोल्हापूर जिल्हयात  दुस-या  टप्यात  335489  इतक्या 0 ते 5 बालकांना पोलिअेा चा डोस देण्यातत येणार आहे.  या मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम वसाहत रुग्णालय गांधीनगर ता करवीर येथे   मा. सौ शौमिका अमल महाडिक, अध्यक्षा, जिल्हा परिषद  कोल्हापूर यांच्या हस्ते  बालकांला डोस पाजून पोलिअेा मोहिमेचा शुभारंभ संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना मा. अध्यक्षा म्हणाल्या की, पोलिओ डोस पासून एकही बालक वंचीत राहणार नाही यांची दक्षाता घावी व सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे आज आपला देश पोलिओमुक्त झाला आहे असे नमुद केले. गांधीनगर रुग्णालयाला स्वतंत्र्य एस.टी.पी. प्लॅट ची आवश्यकता असलेचे डॉ. एल.एस. पाटील यांनी प्रस्ताविक भाषणात सांगितले.  एस.टी. पी. प्रस्ताव सादर करावा, शासनस्तरावर मान्यतेसाठी पाठपुरावा करणेत येईल असे मा. अध्यक्षा यांनी सांगितले. या  कार्यक्रमास  डॉ एल.एस. पाटील, जि.श.चि. मा. सौ.  सरीता कटेजा , पंचायत समिती सदस्या, मा. सौ. रितु लालवाणी, सरपंच, मा. सौ. ठोमके, ग्रा.प. सदस्या   डॉ एफ ए देसाई, प्र. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ कुराडे,  डॉ. माळवे, शुभारंभ  कार्यक्रमास उपस्थित होते. स्वागत व आभार  डॉ. विद्या पॉल,  वैद्यकीय अधिक्षक,  यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. भागवत, मेट्रन,  सौ. वेगुर्लेकर, श्री. प्रकाश खेबुडकर, व सर्व स्टाफ  यांनी केले.

छत्रपती  प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे मा. संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर अाणि मा. इंद्रजित देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांचे हस्ते मोहिमेचे उदघाटन पोलीओ डोस देवून करण्यात आले.  उदघाटन प्रसंगी मा. डॉ उषादेवी कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाल्या की, सर्व बालकांचे योग्य वयात नियमित लसीकरण, नियमित ए.एफ.पी. सर्व्हेक्षण, 0 ते 5 वर्षातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करणे ही पोलिओ निर्मुलनाची त्रिसुत्री आहे असे सांगितले. या प्रसंगी डॉ एल एस पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ हर्षला वेदक, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)  डॉ व्ही .पी. देशमुख, निवासी वैदयकीय अधिकारी, बाहय संपर्क, डॉ. मिरगुंडे, डॉ खैरमोडे उपस्थित होते, डॉ . देसाई एफ.ए.  जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी आभार व्यक्त केले.