पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली बैठक.

दि.10/8/2017 रोजी पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरच्या सभेस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.) जिल्हा परिषद, कोल्हापूर सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी व सर्व उपविभागाचे उप अभियंता, सर्व तालुक्याचे गट संसाधन केंद्र प्रतिनिधी उपस्थित होते. सदरच्या बैठकीचे प्रास्ताविक व बैठकीचे उद्देश मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा. व स्व.) यांनी विशद केला. सदरच्या बैठकीचे कार्यवृत्तांत पूढील प्रमाणे.

  1. प्रपत्र अ ब क व ड प्रमाणे सर्व्हेक्षण कामकाजाचा आढावा घेतला असता यापैकी करवीर व भूदरगड यांचेकडील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा सर्व्हेक्षण अहवाल अप्राप्त आहे. याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचा सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
  2. सर्व्हेक्षण पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींचे अंदाजपत्रक तातडीने पूर्ण करावे यासाठी शासन निर्णयास अनूसरून अंदाजपत्रक तयार करावीत यासाठी शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्तरावरील शोषखड्डे व खतखडे्‌डे कामे नरेगा योजनेतून प्रस्तावित करावीत.
  3. गटविकास अधिकारी पन्हाळा व कागल यांनी नरेगा योजनेतून वैयक्तिक शोषखडा कामे घेण्यासाठी सूधारित आराखड्यास मंजूरी मिळणेबाबत मागणी केली.
  4. शाहूवाडी गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील वैयक्तिक पातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना नरेगा योजनेतून प्रस्तावित असल्याबाबतचा आढावा दिला.
  5. हातकंणगले गटविकास अधिकारी यांना नाबार्ड प्रकल्पासाठी जागा मागणीचे प्रस्ताव जिल्हा परिषद मार्फत मा. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या.
  6. घनकचरा व्यवस्थापन बाबत विविध पर्यांयाची पडताळणी व माहिती घेणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले. तसेच SLRM साठी पोश्टर व लोगो तयार करण्याबाबत सूचित करून त्याबाबतच्या नवीन कल्पना असल्यास जिल्हास्तरावर सादर करण्याबाबत सूचित केले.
  7. गडहिंग्लज गटविकास अधिकारी यांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाणी वहनासाठी गटर आवश्यक असल्याचे सूचित केले त्यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बंदिस्त गटारांचा बृहत आराखडा तयार करण्याबाबत सूचित केले.
  8. उपअभियंता आजरा यांना उत्तुर ग्रा.पं. साठी बक्षिस रक्कमेतून वैयक्तिक शौषखड्डे करणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले.
  9. सर्व उपअभियंता व गटविकास अधिकारी यांना जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन स्थळ असणाऱ्या ग्रा.पं. च्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत विशेष लक्ष देण्याबाबत सूचित केले.
  10. राधानगरी उपअभियंता यांनी 8765 शोषखड्डे नरेगा योजनेतून प्रस्तावित केलेची माहिती दिली. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे नमूद केले यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जास्तीत जास्त वैयक्तिक स्तरावरील उपाययोजना करणे व जागा उपलब्धतेचे सूक्ष्म नियोजन करण्याचे सुचित केले.
  11. तसेच पंचगंगा प्रदूषित न होण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत त्याचा सविस्तर अहवाल उप अभियंता यांनी सादर करण्याबाबत सूचित केले.
  12. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन बाबत आराखडे तयार करीत असताना निधीच्या मर्यादेत न राहता बृहत आराखडा तयार करावा व त्यानंतर सर्व योजनांचा convergence करून कामे पूर्ण होतील असे नियोजन करावे.
  13. मा. अध्यक्षा यांनी सर्व तालुक्यांनी भौगोलिक परिस्थितीनूसार नाविण्यपूर्ण काम करण्याबाबत सूचना केल्या तसेच SLRM बाबत गाव पातळीवर सर्व घटकांचा सहभाग घेण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणेबाबत सूचित केले. तसेच याबाबत काम करीत असताना शासन सुचनांच्या पलीकडे जावून आदर्श काम करून लोकांची मानसिकता बदलण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात यावे.

वरील प्रमाणे मुद्दयांची सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा.व स्व.) यांनी आभार व्यक्त करून सभा संपलेचे जाहिर केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, कोल्हापूर.