FaceBook Like

जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेसाठीचे दरपत्रक मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून गावाची निवड करुन निवडलेल्या गावांतील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन  Antirebis vaccine  व जंतनाशक औषधे देण्यात येणार आहे.

आपले कमीत कमी दराचे जिल्हयामध्ये निवडलेल्या गावात जावून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन  Antirebis vaccine व जंतनाशक औषधे देण्यासाठीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने  दि.6/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्यांचे शस्त्रक्रियेनंतरचा उपचार व पाठपुरावा संबंधीत संस्थेने करणेचा आहे.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
January
SMTuWThFS
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031   
अभ्यागत
109,420