जिल्हा क्रीडा स्पर्धा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आदर्शवत उपक्रम – मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील

कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांचे आरोग्य चांगले राहीले तर विकासाची गती वाढू शकते. समाज विकास अधिक वेगाने होवू शकतो असे उदगार जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी व पदाधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धा उदघाटनावेळी मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी काझ्ले. या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट् राज्याचे महसूल, मदत व पुर्नवसन, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार साहेब यांनी कोल्हापूर जिल्हयाची क्रीडा परंपरा, क्रीडास्पर्धा आयोजनाचा हेतू, कर्मचारी आणि अधिकारी यांचे आरोग्य याविषयी आपले मनोगत व्यक्त करुन अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजन करणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद असल्याचे विषद केले व याबद्रदल सर्व कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांना धन्यवाद दिले.याप्रसंगी या स्पर्धाची माहिती असणारी क्रीडा माहिती पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व पंचायत समिती व मुख्यालयातील सर्व विभागांनी उत्कृष्ट पध्दतीचे संचलन सादर केले. सर्व खेळाडूंना डाएटचे प्राध्यापक श्री. संजय लोंढे यांनी क्रीडा शपथ्‍ दिली. राजर्षि शाहू क्रीडा प्रशालेच्या राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करणेत आला. क्रीडा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी झांजपथ्क व मल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक साजरे केले.

याप्रसंगी शिक्षण सभापती मा. अंबरिष घाटगे यांनी विनोदी शैलीत आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कलामंचच्या कर्मचारी यांनी क्रीडागीत सादर केले.

या समारंभासाठी जिल्हाधिकारी श्री. अविनाश सुभेदार, अमल महाडीक, विशेष्‍ पोलिस महापरिक्षक श्री. विश्वास नांगरे पाटील, डी.वाय.एस.पी. श्री. तिरुपती काकडे, समाजकल्याण सभापती विशांत महापूरे, महिला व बालकल्याण सभापती मा. शुभांगी शिंदे, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, श्री. महेश चौगुले, सौ. मनिषा टोणपे, करवीर पं.स. सभापती श्री. झांबरे, श्री. निंबाळकर, विजय बोरगे, श्री. फरकटे उपस्थित होते. सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी व मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि क्रीडा प्रशालेचे सर्व प्रशिक्षक यांनी अत्यंत नियोजनबध्द असे कार्यक्रमाचे नियोजन केले. क्रीडापंच व मार्गदर्शक श्री. सुभाष पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९, ३० व ३१ जानेवारी २०१८ पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. सूत्रसंचालन श्री. संजय लोंढे व सौ. कुंभार यांनी केले. पदाधिकारी व अधिकारी यांच्या क्रिकेट सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी (साप्रवि) श्री. राजेंद्र भालेराव यांनी मानले.