FaceBook Like

जागतिक महिला दिन 2018

जिल्हा परिषद, कोल्हापूर कडील महिला व बालकल्याण विभागा मार्फत     दि. 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिन 2018, महिलांमध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती कार्यक्रम,अस्मिता योजना शुभारंभ ,अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान 2018 ची उद्घोषणा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सन 2017-18 वितरण सोहळा असा संयुक्तिक क ार्यक्रम राजर्षि छत्रपती शाहु सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे मा. सौ. शौमिका अमल महाडिक, अध्यक्षसोा,   जि. प. कोल्हापूर यांचे शुभहस्ते व मा. श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्षसोा, जि. प. कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमास मा. अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी, कोल्हापूर,  मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारीसोा, जि. प. कोल्हापूर, मा. निलीमा तपस्वी, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार ü यांची विशेष उपस्थिती आहे.जिल्हयातील सोळा प्रकल्पातील प्रत्येकि तीन याप्रमाणे 48 अंगणवाडी सेविकाना पुरस्कार वितरीत करणेत येणार आहे.

या कार्यक्रमास मा. सौ. शुभांगी रामचंद्र शिंदे, सभापतीसोा, महिला व बालकल्याण समिती, मा.श्री.विशांत महापुरे, सभापतीसोा, समाजकल्याण समिती, मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापतीसोा, शिक्षण व अर्थ समिती, मा. श्री. सर्जेराव पाटील (पेरीडकर), सभापतीसोा, बांधकाम व आरोग्य समिती, जि.प.कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  मा. जिल्हा परिषद अध्यक्षा  मा. सौ. शौमिका महाडीक व महिला व बाल कल्याण सभापती मा. सौ. शुभांगी शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
June
SMTuWThFS
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
अभ्यागत
visitors total