FaceBook Like

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा

 

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा

(या क्षेत्रामध्ये काम केलेल्या संस्था/व्यक्ती यांनी उपस्थित राहावे : अमन मित्तल, मु.का.अ, जिल्हा परिषद, कोल्हापूर)

कोल्हापूर :  दि. 08.10.2018.

 

कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागामार्फत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहेत. या कामांना गती मिळावी तसेच या कामांमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करता येईल या हेतूने  मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीसाठी या घकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत काम केलेल्या व्यक्ती अथवा संस्था यांनी या बैठकीसाठी आपल्याकडील तंत्रज्ञानाच्या सादरीकरणासह उपस्थित राहून मार्गदर्शन करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात काही नवीन कल्पना व इतर सूचना असल्यास त्या ही मांडण्याची सर्वांना सदर बैठकीत मुभा आहे. जेणेकरून या कामाचा लाभ ग्रामीण भागातील घनकच-याचे व सांडपाण्याचे व्यवस्थापन  करणेस होईल. दि. 12.10.2018 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सायंकाळी 4.30 मिनिटांनी बैठक संपन्न होणार असून या बैठकीस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) , जि. प. कोल्हापूर उपस्थित राहणार आहेत.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2019 >
January
SMTuWThFS
  12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
अभ्यागत
125,503