खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या सन 2016-17 या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी पावती वितरण

गतीमान प्रशासन योजनेंतर्गत कामकाजामध्ये पारदर्शकता व गतीमानता आणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने भविष्य निर्वाह निधीसाठी पात्र असणाऱ्या 158 खाजगी प्राथमिक  शाळांपैकी 139 शाळांमधील 1000 शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी पावतीचे वितरण जिल्हा परिषद कोल्हापूरच्या अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक या विभागामार्फत सन 2016-17 या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी पावती वितरण समारंभ दि. 06/11/2017 इ. रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूरच्या सभागृहामध्ये सकाळी 11.00 वा. करणेत आले. हा कार्यक्रम मा.डॉ.विलास पाटील, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री. राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, मा.श्री.सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे उपस्थितीत घेणेत आला.

या कार्यक्रमाचे प्रास्तावित कार्यालयाचे अधिक्षक तथा लेखाधिकारी मा.श्रीम.वर्षा परीट  यांनी केले. आपल्या मार्गदर्शनामध्ये श्री. राहूल कदम यांनी शिक्षकांमध्ये आर्थिक साक्षरता होणे आवश्यक असलेबाबत नमूद करुन आर्थिक साक्षरतेचे महत्व विषद केले. शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा.सुभाष चौगुले यांनी आर्थिक सुबत्तेबरोबर शाळेची गुणवत्ता कशी टिकविता येईल याबाबत मार्गदर्शन केले. मा.डॉ.विलास पाटील यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात गरजा कमी करुन बचतीचा मार्ग अवलंबता येतो. याबाबत विविध उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.जयश्री जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प.कोल्हापूर यांनी केले व आभार कार्यालयाच्या सहा. लेखाधिकारी श्रीम. शैला ढाके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी खाजगी प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था मर्या. कोल्हापूर व सर्व शिक्षक संघटनांचे सहकार्य लाभले.

 

 

(सुभाष चौगुले)

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर