FaceBook Like

कोल्हापूर जिल्हयात मातामृत्यू व बालमृत्यू प्रमाणात घट

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जिल्हयातील माता व बाल मृत्यू प्रमाणे कमी करणेसाठी डॉ.कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयामध्ये विविध उपाययोजना द्वारे माता व बाल मृत्यू प्रमाणा कमी करणेत यशस्वी वाटचाल.

दिनांक 17/04/2018 रोजी समिती सभागृह जि.प. कोल्हापूर येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.एल.एस.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.यु.जी.कुभांर, बालरोग तज्ञ शासकिय वैद्यकिय महाविद्यालय डॉ.एस.एस.सरवदे, वैद्यकिय अधिक्षक क.बावडा सेवा रुग्णालय डॉ.बी.एस.थोरात, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी डॉ.फारुख देसाई व डॉ.विलास देशमुख बाहयसंपर्क वैद्यकिय अधिकारी व जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी याच्या उपस्थित पुढील उपाययोजना व कारवाई बाबत सविस्तर चर्चा झाली.

महाराष्ट्र राज्यात एक लाख जिवंत जन्मामागे 68 मातांचा मृत्यू होतो. सन 2020 पर्यंत माता मृत्यू दर 60 पर्यंत खाली आणणेचे उदिष्ट आहे.  कोल्हापूर जिल्हयात सन 2017-18 मध्ये एकुण 29 गरोदर मातांचा मृत्यू झालेला आहे.  त्यापैकी 08 गरोदर माता हया जिल्हया बाहेरच्या आहेत.   कोल्हापुर जिल्हयाचा मातामृत्यूदर 48 आहे.  सन 2020 पर्यंत गाठायच्या अपेक्षित पातळीपेक्षा कोल्हापूर जिल्हयाचा मातामृत्यूदर खुपच कमी आहे.

महाराष्ट्र राज्याचा अर्भक मृत्यू दर हजार जिवंत जन्मामागे 19 इतका असताना कोल्हापूर जिल्हाचा बाल मृत्यू दर 15 इतका आहे. सन 2017-18 मध्ये कोल्हापूर मधील ग्रामीण भागात एकुण 124 बाल मृत्यू झाले आहेत. सन 2016-17 मध्ये एकुण 158 बालमृत्यू झाले होते.

माता व बाल मृत्यू प्रमाण कमी करणेसाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये नियमित प्रत्येक माता व बाल मृत्यूचा आढावा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखालील समिती मध्ये घेतला जातो व भविष्यात माता व बाल मृत्यू टाळणेसाठी सुधारणा सुचित केल्या जातात.  यामध्ये माता व बालमृत्यूचे वयानुसार जन्म व मृत्यू ठिकाण नुसार व माता व बालमृत्यूच्या कारणानुसार आढावा घेऊन सविस्तर चर्चा केली जाते.  या अनुषंगाने सन 2017-18 ची वार्षीक माता व बालमृत्यू बैठक मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेणेत आली.  सन 2018-19 मध्ये माता व बालमृत्यू प्रमाण कमी होणेसाठी पुढील प्रमाणे निर्देश देणेत आले.

  • प्रत्येक गरोदर मातेच्या सोनोग्राफी सहित आवश्यक सर्व तपासण्या शासकिय आरोग्य संस्थेमार्फत करणे व त्यामधुन निदान झालेल्या अतिजोखमीच्या गरोदर मातांना नियमित पाठपुरावा करुन योग्य आरोग्य संस्थेमध्येच प्रसुती होईल याचे नियोजन.
  • गरोदर मातांची तपासणी व पाठपुरावा वेळेवर होणेसाठी गरोदर मातांना मोबाईल फोन द्वारे दरमहा व्हॉईस संदेश हि जि.प. स्वनिधी योजना या वर्षी कार्यान्वित ठेवणे.
  • आशा स्वंयसेविका व आरोग्य सविका यांच्या आरोग्य सेवाना प्रतिसाद न देणा-या गरोदर मातां व आजारी बालकांच्या पालकांचे वरिष्ठ अधिका-याकडुन मतपरिर्तन करुन योग्य उपचार सुरु ठेवणे.
  • घरी अथवा वाटेत होणा-या प्रसुती / जन्म टाळणेसाठी लवकरात लवकर गरोदर मातेची तपासणी करुन नजीकच्या आरोग्य संस्थेत संदर्भसेवा देणे व यासाठी आरोग्य संस्थेच्या रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवणे.
  • गरोदर मातेस व बालकास शासकीय वाहण व्यवस्था उपलब्ध होणेसाठी 102 व 108 या टोलफ्री नंबरची जास्तत जास्त प्रसिध्दी करणे.
  • दुर्गम भागातील व अतिजोखमीच्या गरोदर मातांना प्रसुती पुर्वी योग्य ठिकाणी स्थंलातरीत करणे यासाठी पाहुणी रुग्ण्यालयाची ही योजना कार्यान्वित करणे.
  • आरोग्य संस्था स्तरावरील दरमहा 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत सर्व माताची स्त्रीरोग तज्ञामार्फत तपासणी करुन घेणे व प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र स्तरावर सर्व गरोदर मातांची नियमित तपासणी करणे.
  • नवजात अर्भकाची काळजी घ्ज्ञेसाठी सर्व आरोग्य संस्थेच्या ठिकाणी उपकंेद्र प्रा.आ.केंद्र New Born Care Corner ची स्थापना करणेत यावी.
  • जन्मजात व्यंग मुळे होणारे बाल मृत्यू टाळणेसाठी गरोदरपणाच्या 16 ते 20 आठवडयादरम्यान अतिजोखमीच्या गरोदर मातांच्या गर्भाची व्यंग तपासणी करुन घ्यावी यासाठी जिल्हयातील रिडेओलॉजीस्ट संघटनेशी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित पध्दतीने समजुतीचा करारनामा MOU करणेत येऊन त्यासाठी सर्व आरोग्य संस्थानां मार्गदर्शनपर परिपत्रक देणेत येणार आहे.
  • स्त्री जातीचा आचानक बाल मृत्यू घरी झालेस त्याची एमएलसी पोलिस केस करुन शवविच्छेदन करुन घेणे.

 

अ.न. माता मृत्युची प्रमुख कारणे उपाययोजना
1 गरोदरपणातील उच्चरक्तदाब, हदयरोग व गभजन्य विषबाधा (Eclampsia) गरोदरपणाची 12 आठवडयाच्या आत नोंदणी व स्त्रीरोग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नियमित उपचार
2 जंतुदोष  (Septicemia) संस्थेत प्रसुती, आरोग्य शिक्षण व वैयक्तीक स्वच्छता
3 प्रसुतीपश्चात अति रक्तश्राव (PPH) गरोदर पणातील योग्य व समतोल आहार
गरोदरपणामध्ये रक्तवाढीच्या गोळयाचे नियमित सेवण
4 असुरक्षित गर्भपात तज्ञ डॉक्टरांच्या सल्याने गर्भपात

 

अ.न. बाल मृत्युची प्रमुख कारणे उपाययोजना
1 कमी वजनाचे कमी दिवसाचे जन्म गरोदरपणात वैद्यकिय सल्यांनुसार योग्य काळजी
2 जन्मत बाळ गुदरमणे आरोग्य संस्थेत प्रशिक्षीत व्यक्ती कडुन प्रसुती, मातेचे आरोग्य शिक्षण
3 बाळाचे जन्माजात व्यंग गरोदरपणाच्या 16 ते 20 आठवडया दरम्यान गर्भाचे Anamoly Scan Sonogrphy करुन घेणे.

कोल्हापूर जिल्हयात माता मृत्युव बाल मृत्यु प्रमाणा सातत्याने घट होणेसाठी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी आपल्या अध्यक्षतेखाली समिती च्या सभेमध्ये नियमितपणे आढावा घेऊन मृत्यूच्या कारणानुसार उपाययोजना सुचित करुन आरोग्य यंत्रणेला मागदर्शन करुन सुचनांचा पाठपुरावा करुन घेतला आहे.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2019 >
January
SMTuWThFS
  12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
अभ्यागत
127,976