आरोग्य विभाग

ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंन्त वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आरोग्य सेवेचे कामकाज करतात तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यमांतर्गत अपेक्षित लाभार्थींना सेवेसाठी प्रवृत्त करतात व आवश्यकते नुसार योग्य ठीकाणी संदर्भ सेवा देतात.

सर्वासाठी आरोग्य हे जागतीक आरोग्य संघटनेचे ध्येय गाठण्यासाठी वैधकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत लोकसहभागातुन ग्रामिण भागातील जनतेला सातत्याने गुणात्मक सेवा देत असतात.
१. प्राथमिक आरोग्य केंद्गे ७३
२. प्राथमिक आरोग्य उपकेंद्गे ४१३
३. ग्रामीण रुग्णालये १८
४. उप जिल्हा रुग्णालये २

 
वेगाने वाढणार्‍या लोकसंख्या नियंत्रण ठेवणेकरिता राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्या देशात १९५२ पासून राबविणेत येत आहे.या कार्यक्रम अंतर्गत दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे करिता पाळणा लांबविण्याच्या तात्पुरत्या पध्दती उदा-तांबी,गर्भनिरोधक गोळया,निरोध,तांतडीच्या गोळया, (इमर्जन्सी पिल्स) इ साधने उपलब्ध असून पाळणा थांबविणेसाठी टाका व बिनटाका या स्त्रीशस्त्रक्रिया व बिनटाका व पारंपारिक पध्दतीच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. (more…)
भारत सरकारने समाजातील गरीब, जोखमीच्या व दारीद्रय रेषेखालील लोकांना परिणाम कारक सेवा पुरविणेसाठी तसेच माता मृत्यू, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे व एकुण जनन दर कमी करणे यासाठी सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM-National Rural Health Mission) ची स्थापना केली आहे. त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हयामध्ये जिल्हा आरोग्य अभियान ची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य संबधित इतर कार्यक्रम यांच्या मधील समन्वय तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायीक व सेवाभावी संस्था यांचा सहभाग घेऊन आरोग्याचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे हे अभियानाचे प्रमुख ध्येय आहे. (more…)

र्‍हदयरोग, कॅन्सर व किडणी या रोगांनी पिडीत असलेल्या रुग्णांना जि.प. स्वीय निधीतून आर्थिक मदत.

योजनेचे स्वरुप :- या योजनेअंतर्गत ग्रामिण कार्यक्षेत्रातील लाभार्थीना खालील प्रमाणे आर्थीक मदत मिळते. अ) र्‍हदय शस्त्रक्रिया करिता :- र.रु.१०,०००/- ब) कॅन्सर उपचार करिता :- र.रु.७,०००/- (more…)
प्रस्तावना भारत सरकारने गलगंड या कार्यक्रमाचे नाव 1992 नंतर आयोडिन न्युनता विकार नियंञण कार्यक्रम असे ठेवले आहे. आयोडिन हे महत्वाचे सुक्ष्म घटक आहे व ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. तसेच ते थायरॉईड हार्मोन तयार करणे कामी आवश्यक आहे. रोज 150 मायक्रोग्रॅम ची शरीराला गरज असते. आयोडिन हे पाणी, मासे, समुद्रातील अन्ना‍मध्ये मिळते. आयोडिनचे प्रमाण हे पर्वताजवळ, पर्वतावरुन येणा-या पाण्यात कमी प्रमाणात असते. आयोडिन कमी झाल्यामुळे खालील विकार संभावतात
  1. गलगंड
  2. शारीरिक व मानसिक वाढ कमी होणे
  3.  उंची कमी होणे
  4. उंची जास्त होणे
  5. गर्भपात होणे सारखे आजार उदभवतात
महाराष्ट्र राज्याची रुपरेषा महाराष्ट्र् राज्यात गलगंड कार्यक्रम हा मध्यवर्ती आरोग्य समितीच्या् मार्गदर्शक सुचनेप्रमाणे खालील हेतुने दिला आहे.
  •        गलगंड सर्वेक्षण करणे
  •        आयोडिनयुक्तश मिठाची निर्मीती करणे
  •     आयोडिनयुक्‍त मिठाचा वापर करणे
  •  साधे मिठ वापरण्‍यावर बंदी आणणे (निवडक जिल्‍हयामध्‍ये )
  • मिठामधील आयोडिनची मात्रा तपासणे
  •     आयोडिनयुक्‍त मिठाच्‍या वापरासाठी आरोग्‍य शिक्षण देणे
  •   आयोडिनयुक्‍त मिठाचे पॅकेटस नियमित आदिवासी भागात वाटप करणे.
  कार्यक्रमाची उददिष्‍टे
  •  कार्यक्रम आखणे व सर्वेक्षण करणे
  • आयोडिन युक्‍त मिठाच्‍या वापराचे शिक्षण देणे
  •  मिठाचे नमुने तपासणे
  • गलगंड रुग्णांना ओषधोपचार व सल्ला देणे
प्राथमिक आरोग्ये केंद्र व ग्रामीण रुग्णालयाचे नियमित कामकाज ग्रामीण भागातील नियमित भेटीमध्ये संशयीत रोगी शोधणे, मिठाचे नमुने तपासणे, लघवीचे नमुने जमा करणे व आयोडिन तपासणे, आरोग्य शिक्षण देणे  
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सर्व साधारण माहिती क्षयरोग हा मायकोबक्टेरियम नावाच्या जीवानूमुळे होतो. हा आजार माणसाला फार पूर्वीपासून माहीत असून प्रचीन काळी त्याला राजक्षय या नावाने संबोधले जायचे. क्षयरोग प्रामुख्याने फुप्फुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसीकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनासुद्धा होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफुसाच्या क्षयरोगाने आजारी असणारी व्यक्ति शिकते किंवा खोकते तेव्हा क्षयरोगच्या जिवाणूंचा प्रसार होतो. (more…)

नावीन्यपूर्ण योजना

जि.प. स्वनिधी मधुन नाविन्यपूर्ण योजना सन 2015-16   संक्षिप्त माहिती
  • जिल्हयातील गरोदर मातांना व्हाईस मेसेज द्वारे शासकीय आरोग्य सेवेचा लाभ व मार्गदर्शनपर व्हाईस संर्दश भ्रमणध्वनीवर पाठविणे हा उद्वेश असुन सदर गरोदर मातानां या योजनेद्वारे लाभ देणे.
  • व्हाईस मॅसेज दिल्याने सदर लाभार्थी हा आपला लाभ घेण्यास दक्ष होऊन आरोग्य सेवा त्वरीत उपलब्ध करुन घेऊ शकतो.
  • सदर योजेने अंतर्गत 8 व्हाईस एसएमएस तयार करणेत आलेले असुन त्याचे रेकॉर्डीग करण्यात आलेले आहे.
  • योजनेचा लाभ देणेसाठी सद्यस्थिती मध्ये 10000 गरोदर मातांचे भ्रमणध्वनी क्रमांक सध्या एकत्रीत करण्यात आलेले आहे.
  • सदर योजना हि जिल्हा परिषद स्वनिधी मधुन असुन सदर योजनेस 25,000/- इतके प्राप्त होते 30000 गरोदर मातानां लाभ देण्यात आलेला आहे.
(more…)
एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प (IDSP) विकेंद्रीत स्वरुपात राबवायचा देशांतर्गत कार्यक्रम आहे. साथ उदे्रकाच्या आधी धोक्याची सुचना देणारी चिन्हे / लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करणे हा प्रकल्पाचा उददेश आहे. मिळालेल्या माहितीचा उपयोग रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या संनियंत्रणासाठी करुन आरोग्याची साधने, स्त्रोत जास्त परिणामकारकरित्या वापरता यावेत ही पण यामागची भुमिका आहे. (more…)
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम योजनेची कार्यपध्‍दती सहसंचालक,आरोग्‍य सेवा, (हिवताप,हत्‍तीरोग व जलजन्‍यरोग) पुणे हे राज्‍यस्‍तरावर कार्यक्रम प्रमुख आहेत व ते योजनेवर नियंत्रण ठेवतात. सहसंचालक, आरोग्‍य सेवा, (हिवताप,हत्‍तीरोग व जलजन्‍यरोग) पुणे-६ यांना सहाय्यक संचालक,आरोग्‍य सेवा (हत्‍तीरोग) पुणे व राज्‍य किटकशास्त्रज्ञ सहाय्य करतात. त्‍याचप्रमाणे प्रादेशिक स्‍तरावर सहाय्यक संचालक, आरोग्‍य सेवा,(हिवताप) व जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा हिवताप अधिकारी हे सहाय्य करतात. (more…)

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

कुष्ठरोग हा मायको बॅक्टेरिअम लेप्री या जंतुमुळे होणारा अत्यल्प सांसर्गिक आजार आहे.

कुष्ठरोगाची संशयित लक्षणे :- न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा/चट्टे हातापायातील मज्जातंतू जाड व दुखर्‍या होणे. कोल्हापूर जिल्हयातील सर्व ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व शासकिय व निमशासकिय दवाखान्यात कुष्ठरोगावरील निदान व उपचाराची विनामुल्य सोय उपलब्ध आहे. कुष्ठरोगावरील बहुविध औषधोपचार नियमित घेतल्याने ( ६ महिने किंवा एक वर्ष) कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो. (more…)
बातम्या व घडामोडी
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2017 >
July
SMTuWThFS
      1
2
  • All day
    2017.07.02

    Happy Birthday Sir….

    From ZIllha Parishad  kolhapur

345678
  • All day
    2017.07.08

    शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर हा सण शहर आणि परिसरात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा केला जातो.

910
  • All day
    2017.07.10

    Happy Birthday Sir….

    From Zilla Parishad Kolhapur

1112131415
16171819202122
23
  • All day
    2017.07.23

    लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव.

242526
  • All day
    2017.07.26

    Happy Birthday  शिल्पा पाटील  Mam….

    From ZIllha Parishad  kolhapur

27
  • All day
    2017.07.27

    श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा.

2829
3031     

रोजच्या बातम्या

अभ्यागत
visitors total