आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना सुरक्षा कवच

केद्र सरकारच्या महात्वकांक्षी योजना आयुष्यमान भारत  या योजने अंतर्गत  राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आयुष्यमान भारत दिवस ग्रामीण लाभार्थी पडताळणी , अतिरिक्त माहिती संकलन  मोहिम  15 एप्रिल 2018 ते 21 मे 2018  रोजी राबविण्यात येणार आहे असे मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी . जि.प. कोल्हापूर यांनी  गटविकास अधिकारी,  तालुका आरोग्य अधिकारी,  यांच्या आढावा सभेमध्ये मार्गदर्शन करतांना सांगितले. या अभियानसाठी 30 एप्रिल 2018 रोजी ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक/ आशा यांच्या  सहकार्याने अतिरिक्त माहिती छापील नमुन्यात गोळा करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये, 1)  कुटुंब प्रमुखाची माहिती फार्म मध्ये लिहली जाईल 2) कुटुंब प्रमुखाची माहिती उपलब्ध नसल्यास इतर सदस्यांची माहिती नोंदवावी. 3) तसेच  कुटुंबात अतिरिक्त व्यक्तिची माहिती भरणे, नांवे वगळणे इ. माहिती संकलित करण्यात येणार आहे. आढावा सभेसाठी मा. राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांची नोंदणी करावी असे सांगितले. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी/जिल्हा आरोग्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परीषद तसेच तालुका स्तरावर गट विकास अधिकारी,पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्य मार्गदर्शनाखाली हि मोहिम राबविण्यात येणार आहे.

डॉ. सुहास कोरे, प्र. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, बोलतांना सांगितले की,  या योजने अंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंबांना प्रति कुटंुब प्रति वर्ष 5 लाख पर्यत मान्यता प्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया उपचाराच्या माध्यतून विमा सरक्षंण मिळणार आहे.  देशात 10 कोटीहुन अधिक गरीब दुर्बल घटक, राज्यात 83.63 लक्ष लाभार्थी कुटंुबे, वंचित घटक लाभार्थी आहेत. लाभार्थी देशभरात कोणत्यांही मान्यता प्राप्त रुग्णालयात लाभ घेवू शकतात. या योजनेसाठी  माहिती, शिक्षण संवाद ही महत्वपूर्ण बाब आहे असे नमुद केले.